स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
विविध क्षेत्रातील मान्यवरांसह पालकांची विशेष उपस्थिती .

केज तालुका प्रतिनिधी
केज शहरात 29 जानेवारी बुधवार रोजी स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलनचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विकासजी मिरगने उपाध्यक्ष मराठवाडा व्यापारी असोसिएशन व कार्यक्रमाचे उघ्दाटक श्री. गदळे सर सचिव जीवन विकास शिक्षण मंडळ यांच्या हस्ते संपन्न या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी श्री. इंगळे साहेब, श्री. जोशी सर, इंगळे मॅडम यांची उपस्थिती होती . या पाहुण्यांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक श्री. कोकीळ सर व श्री. विनोद गुंड, तालुका क्रीडा संयोजक यांनी केले. यावेळी मार्गदर्शन करताना श्री. गदळे सर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील करिअरची संधी, अभ्यास विषय महिती व योग आरोग्य व संतुलित आहार माहिती दिली.कार्यकामाचे अध्यक्ष श्री. मिरगने सर यांनी विद्यार्थी मधील विविध कलागुणांसाठी शुभेच्छा दिल्या. या वार्षिक स्नेहसंमेलन मध्ये विद्यार्थीनी अनेक गीत सादर केली वेळी मराठी गीत पोवाडा,देशभक्ती ,भारूड,लावणी, गोंधळ, व हिंदी गीत सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. तपसे मॅडम व कल्याणकर मॅडम यांनी केले. या कार्यक्रमासाठी सौ जाधव मॅडम,सौ विटेकर मॅडम,सौ बेदरे मॅडम, सौ लोखंडे मॅडम, श्री वाघमोडे सर , सौ. काळे मॅडम , सौ चोले मॅडम , सौ कापसे मॅडम, सौ हंडीबाग मॅडम, सौ सावंत मॅडम, सौ पालवे मॅडम, श्री. गवळी सर वशिक्षक व शिक्षका व शिक्षकेत्तर कर्मचारी मेहनत घेतली.