शाळा हे संस्काराचे केंद्र असते-शेख जुलेखा

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
नेकनूर /प्रतिनिधी
माता ही प्रथम शिक्षिका असते त्यामुळे घर हे प्रथम संस्काराचे केंद्र असते असे मत मातापालक सभेत बोलताना शेख जुलेखा यांनी व्यक्त केले .येथील ग्रामीण माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात माता पालक सभेची आणि सी.सी.आर.टी.सांस्कृतिक क्लब अंतर्गत हळदीकुंकवाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी गावातील बहुसंख्य पालक माता उपस्थित होत्या .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या कदम के.के.या होत्या तर प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीमती सरला सदाशिव रोकडे या उपस्थित होत्या तसेच महिलांना आरोग्याचे मार्गदर्शन देण्यासाठी डॉक्टर शिल्पा सनतकुमार सोडगे यांची उपस्थिती होती .कार्यक्रमाच्या सुरुवातीस सावित्रीबाई फुले यांच्या फोटोस पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली .प्रथम श्रीमती गर्जे मॅडम यांनी रथसप्तमी चे महत्व सांगून त्याचे भारतीय संस्कृतीतील महत्व याचे मार्गदर्शन केले .नंतर डॉक्टर शिल्पा सनतकुमार सोंडगे यांनी मातांना उद्देशून बोलताना मुलींचे शारीरिक ,भावनिक बदल व त्यानुसार त्यांचा आहार कसा असावा याचे सखोल मार्गदर्शन केले .तसेच वेळेनुसार आरोग्य तपासण्या कराव्यात असेही त्यावेळी सांगितले . आयुर्वेदातील संस्कृत सुभाषितांच्या दाखला देत आरोग्याची पौराणिक महत्त्व यावेळी त्विविध उदाहरणाच्या माध्यमातून सांगितले .त्यानंतर सरला रोकडे यांनी घरातील महिला कुटुंबासाठी आपले सर्वस्व पणाला लाऊन कुटुंब चालवत असते लता खरे यांच्या मॅरेथॉन स्पर्धेतील विजयाचे उदाहरण देऊन प्रत्येक स्त्री ने कांखरपणे आपल्या कुटुंबासोबत उभे राहावे असे सांगितले .किशोरवयीन अवस्थेतून जाताना आपल्या मुलांकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे असे मत यावेळी व्यक्त केले .शेख जुलेखा यांनी बोलताना प्रत्येक मातेने शिक्षणाप्रती सजग राहून आपल्या पाल्यांना शिक्षण द्यावे जेणेकरून ते परिपूर्ण नागरिक तयार होतील .विविध क्षेत्रातील मुलांना करिअरच्या संधी आहेत त्यांच्या कलानुसार मातांनी आपल्या मुला-मुलींना त्या क्षेत्रात जाण्यास प्रोत्साहित करावे असे मत व्यक्त केले .नंतर विद्यालयाच्या प्राचार्या कदम के.के. यांनी अध्यक्षीय भाषणात बोलतांना माता ह्या कुटुंबाचा कणा असतात शाळा आणि आपल्या पाल्याच्या समस्या यांच्याबाबत त्यांनी विद्यालयात येऊन शिक्षकांबरोबर चर्चा करावी असे सांगितले .स्त्रीने ठरवले तर ती कुटुंबाचा उद्धार करू शकते .शिक्षणाबरोबरच आरोग्याची काळजी प्रत्येक मातांनी घेतली पाहिजे असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.काळे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती सोनवणे मॅडम यांनी केले .