पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या-महादेव घुले

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष
कृषी क्षेत्रातील चालू घडामोडी
केज : प्रतिनिधी
गेल्या आठ दिवसापासून राज्यामध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे.कसेबसे आलेले पीकही पावसाने हिसकावून घेतल्याने सणासुदीच्या तोंडावर संकट आले आहे. अपेक्षित नसताना आलेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्याचे चागंले आलेलं पीक कापूस,मूग, तूर,सोयाबीन पाण्यात गेले आहे.केज तालुक्यात गेल्या आठ दिवसापासून पावसाच्या सतत धारेने तालुक्यातील सर्वच महसूल मंडळात अतिवृष्टी झालेली आहे.या अतिवृष्टी चे तात्काळ पंचनाने करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी.आलेल्या अस्मानी संकटाने शेतकरी व्यतीत झाला असून नगदी पीक असणारे मुग आणि सोयाबीन हाताचे गेलेले दिसत आहे.सणासुदीच्या तोंडावर शेतकऱ्याचे निसर्गान आलेले पीक हीसकावून घेतल्याने शेतकऱ्याला सणासुदीच्या तोंडावर सावकाराच्या दारात गेल्याशिवाय पर्याय राहायला नाही तरी सरकारने ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेसाठी कोणतीही निकष न ठेवता तात्काळ तात्काळ दोन हप्ते वर्ग केले. त्याच धरतीवर तात्काळ शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे शेतकरी सेनेचे केज तालुकाध्यक्ष महादेव घुले यांनी केजचे तहसीलदार यांना निवेदन देऊन केली आहे.