रमजान महिन्यात अखंडीत वीज पुरवठा करण्यात यावा – गणेश गंगणे
महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांना अखिल भारतीय किसान काॅंग्रेसचे निवेदन

अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी
पवित्र रमजान महिन्यात अखंडीत वीज पुरवठा करण्यात यावा अशी मागणी अखिल भारतीय किसान काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश बिभीषण गंगणे यांनी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता यांना मंगळवार, दिनांक २१ मार्च रोजी दिलेल्या निवेदनातून केली आहे.
अखिल भारतीय किसान काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश गंगणे यांच्यासह राडी व पंचक्रोशीतील नागरिकांनी मिळून मंगळवारी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, रमजानच्या पवित्र महिन्यात राडी येथील विजेची लोडशेडींग बंद करून योग्य दाबाने अखंडीत वीजपुरवठा करण्यात यावा. मुस्लीम धर्मीयांचा पवित्र रमजान महिना दि.२३ मार्च २०२३ ते २४ एप्रिल २०२३ या कालावधीत सुरू होत आहे. या कालावधीत लहान, थोर, महिला आणि पुरूष उपवास करतात. त्यांना सहेरीसाठी दररोज रात्री ३ वाजता स्वयंपाक करण्यासाठी उठावे लागते. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. तरी वरील कालावधीत उच्च दाबाने विजपुरवठा करून विजेचा लपंडाव व लोडशेडींग बंद करून अखंडीत विज पुरवठा करण्यात यावा अशी विनंती सदरील निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनावर अखिल भारतीय किसान काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश बिभीषण गंगणे, काॅंग्रेस ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष धनराज भरत कोळगिरे, संभाजी ब्रिगेडचे दत्तात्रय गंगणे, शिवाजी गंगणे, सत्तार शेख, सिद्दीक सय्यद, उतरेश्वर मुळे, शेख नूर शेख अली, राजा बागवान, फारूक बागवान, माणिकराव जाधव, सादेख पठाण, तैय्युम सय्यद, दस्तगीर बागवान, फतरू सय्यद, दगडू सय्यद, मौलाना सय्यद, आखिर पठाण, आदम सय्यद, सत्तार सय्यद, तय्यब शेख, गणी सय्यद, फारूख सय्यद, अभिजीत जाधव, युवराज गायकवाड, ॠषिकेष गंगणे आदींसह इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत