आपला जिल्हाकृषी विशेषराजकीयसामाजिक

सरकारने शंभर टक्के पिक विमा द्यावा ; शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करा

संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रविण ठोंबरे ; उपजिल्हाधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांना यांना निवेदन

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज

अंबाजोगाई (प्रतिनिधी)

सन २०२३ चार प्रधानमंत्री पिक विमा मंजूर करून तो सरसकट देण्यात यावा, शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करा, ई-पिक पाहणी अट रद्द करा आणि सन २०२० चा पिक विमा द्यावा अशी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रविण उत्तमराव ठोंबरे यांनी केली आहे. याबाबत संभाजी ब्रिगेडच्या वतीने उपजिल्हाधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. मागील अनेक महिन्यांपासून संभाजी ब्रिगेडने हा विषय लावून धरला आहे. पाठपुरावा सुरू ठेवला आहे.

 

संभाजी ब्रिगेडच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना १६ ऑगस्ट रोजी तर तालुका कृषी अधिकारी यांना २० ऑगस्ट रोजी देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, अंबाजोगाई तालुक्यात दुष्काळ पडला आहे. १४ जुलै नंतर रिमझिम पाऊस पडला. त्या पावसावर शेतकऱ्यांनी बळेच पेरणी केली. जुन ते सप्टेंबर महिन्यात अत्यंत कमी पाऊस पडल्यामुळे अंबाजोगाई तालुक्यात दुष्काळ पडला आहे. खरीप सन – २०२३ ऑक्टोबर महिन्यात सोयाबीन काढणी चालू होती. त्या दरम्यान मौजे पाटोदा (म.) येथे ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात काढणी पश्चात एका तासात ९० मिली पाऊस पडला. म्हणून शेतकऱ्यांच्या पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. सोयाबीन शेतात उभे असताना कृषि अधिकारी यांनी शेतातील सोयाबीन काढले असा १५ ऑक्टोबर २०२३ रोजी चुकीचा रिपोर्ट दिला आहे. शेतकरी यांनी ७२ तासाच्या आत विमा कंपनीकडे ऑनलाईन तक्रार केली होती. परंतु, विमा कंपनीने आमच्या तक्रारीची साधी पाहणी ही केली नाही. तक्रारीचे काय झाले. याबाबत सूचना किंवा नोटीस दिली नाही. परंतु, अंबाजोगाई तालुक्यातील काही शेतकरी यांना पोस्ट हार्वेस्टचा पिक विमा मिळाला आहे. जे काही थोडा बहुत सोयाबीनला उतार आला आहे. ते शेतकऱ्यांचे सोयाबीन व्यापारी मातीमोल भावाने विकत घेत आहे. म्हणून यावर्षी शेतकरी यांची आर्थिक परिस्थिती खालावली, महाराष्ट्रात ४० तालुक्यात दुष्काळ पडला आहे. अंबाजोगाई तालुक्यात तीव्र दुष्काळ पडल्यामुळे शेतकरी यांना दुष्काळाचा काहीच फायदा झालेला नाही. त्यामुळे पुढील मागण्या करीत आहोत. त्या मागण्या अशा की, १) म्हणून शासनाने शेतकऱ्यांना १०० टक्के पिक विमा द्यावा., २) महाराष्ट्रातील शेतकरी यांचे सरसकट कर्ज माफ करावे., ३) सध्या सोयाबीन व कापूस या पिकांना हेक्टरी पाच रूपये अनुदान आले आहे. परंतु, ज्या शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी केली नाही. त्या शेतकऱ्यांचे नांव अनुदान यादीत नाही. तरी त्या शेतकऱ्यांकरिता शासनाने ई-पिक पाहणी अट रद्द करावी. तसेच ४) सन २०२० चा पिक विमा द्यावा. आमच्या या मागण्या लवकर नाही मान्य केल्या तर आम्ही दिनांक २४ ऑगस्ट २०२४ रोजी तालुका कृषि अधिकारी कार्यालय, अंबाजोगाई व तालुका विमा कंपनी कार्यालय समोर एका दिवसाचे लाक्षणिक उपोषण संभाजी ब्रिगेड तालुका अंबाजोगाई करणार आहे. तसेच मे.साहेब यांनी आमच्या अर्जाची योग्य चौकशी करून शेतकरी यांना योग्य न्याय द्यावा हि नम्र विनंती आहे. निवेदनावर संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष प्रविण ठोंबरे, संभाजी ब्रिगेड महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अश्विनीताई यादव, तालुकाध्यक्षा सुनंदाताई लोखंडे, संभाजी ब्रिगेड जिल्हा सचिव नारायण मुळे, तालुकाध्यक्ष सिद्राम यादव, मराठा सेवा संघाचे मा.जिल्हाध्यक्ष रामकिसन मस्के आणि अण्णासाहेब देशमुख यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. तर निवेदन देताना केशव टेहरे, लहू शिंदे, परमेश्वर मिसाळ यांच्यासह संभाजी ब्रिगेडच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सदरील निवेदनाच्या प्रती तालुका कृषि अधिकारी, तालुका विमा कंपनी कार्यालय, जिल्हा कृषि अधिक्षक कार्यालय आणि जिल्हा विमा कंपनी कार्यालय, बीड यांना देण्यात आल्या आहेत.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.