सावळेश्वरचे वैचारिक व्यक्तीमत्व माजी सरपंच स्व.लक्ष्मणरावजी भगवानराव दौंड यांच्या 13 व्या पुण्यस्मरणानिम्मित शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
जिल्हा परिषदेत कार्यरत सहशिक्षक श्री गणेश लक्ष्मण दौंड व महादेव लक्ष्मण दौंड यांनी वडीलांच्या पुण्यतिथीनिमित्त राबवला सामाजिक उपक्रम

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
सामाजिक उपक्रम
बीड जिल्हा प्रतिनिधी
दि.6 जुलै रोजी केज तालुक्यातील मौजे सावळेश्वर (पै) येथील सामाजिक , राजकीय , कृषी शैक्षणिक , क्षेत्रात ज्यांचा नावलौकिक होता असे मौजे सावळेश्वर गावचे माजी सरपंच म्हणून ज्यांनी राजकीय क्षेत्रात नाव कमावले होते ज्यांना केज तालुक्यातील पंचक्रोशीत विशेष ओळख होती असे स्व लक्ष्मणरावजी भगवानराव दौंड यांच्या १३ व्या पुण्यस्मरणानिम्मित गावच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्याचा सामाजिक उपक्रम जिल्हा परिषदे शाळेचे कार्यरत शिक्षक श्री गणेश लक्ष्मण दौंड व श्री महादेव लक्ष्मण दौंड यांनी आपल्या वडिलांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा देत राबवला असुन सदरील उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असुन या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मौजे सावळेश्वरचे युवा नेतृत्व श्री अंकुश आबा करपे (उपसरपंच) , प्रमुख उपस्थिती डॉ बंडु (शिवाजी) मस्के , सरपंच श्री मारुती कांबळे , चेअरमन श्री बापुराव पवार , नानाभाऊ पवार राजाभाऊ करपे , बंडु दौंड , नरसिंग दौंड , सुंदर पवार , उमेश मस्के , रामकिशन करपे , जितेंद्र मस्के , तसेच मंगल लक्ष्मण दौंड , चि.प्रतिक गणेश दौंड , शाळेतील शिक्षकवर्ग घुले मॅडम , कुसुम सोनवणे मॅडम , दैवशाला मिटकरी मॅडम , व मदतनीस सुमित्रा दौंड सह गावातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती यावेळी होती यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करुन शिक्षणात यश संपादन करावे असे नमूद करून सदरील कार्यक्रमासाठी उपस्थितांचे आभार आयोजक श्री गणेश दौंड सर यांनी मांडले व सर्वांच्या सहकार्याने शालेय साहित्य वाटप उपक्रम यशस्वीपणे सर्वांच्या सहकार्याने संपन्न झाला.