आपला जिल्हावैभवशाली महाराष्ट्र न्युज

केज तालुक्यातील ग्रामपंचायतीवर बजरंग सोनवणे यांचे वर्चस्व कायम

युसूफ वडगाव ग्रामपंचायतीवर एकतर्फी विजय

(प्रतिनिधी) महादेव दौंड- केज तालुक्यातील २४ ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीच्या निकालामध्ये येडेश्वरी साखर कारखान्याचे सर्वेसर्वा बजरंग सोनवणे यांनी स्वबळावर ९ तर २ संमिश्र ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविले आहे.

 

त्यामध्ये युसूफ वडगाव ग्रामपंचायतीवर एकतर्फी विजय मिळवत गड कायम राखला आहे. तसेच नायगाव, काळेगावघाट,शिरपूरा,मुलेगाव, लिंबाचीवाडी, बनकरंजा, रामेश्वरवाडी, पिट्टीघाट, ग्रामपंचायतीवर विजय मिळविला आहे. तर होळ व नांदूरघाट जरी विरोधी गटाचे निवडून आले असले तरी ग्रामपंचायत सदस्य सोनवणे गटाचे निवडून आलेले आहेत.

 

या सर्व निवडून आलेल्या लोकनियुक्त सरपंच व सदस्यांचे अभिनंदन केज येथील पवनसुत संपर्क कार्यालय येथे बजरंग सोनवणे यांनी केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.