सुधाकर बापू लांब यांच्या मार्गदर्शनाखाली जय जवान जय किसान पॅनलचा दणदणीत विजय

केज/ प्रतिनिधी (महादेव दौंड)
केज तालुक्यातील बंनकरंजा येथे धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा दणदणीत विजय झाला आहे अशी प्रतिक्रिया जय जवान जय किसान पॕनल प्रमुख सुधाकर बापु लांब यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली.याबाबत ची सविस्तर माहिती अशी की,दिनांक ५ नोव्हेंबर २०२३ रोजी केज तालुक्यातील बनकरंजा ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक मतदान संपन्न झाले.यामध्ये सरपंच पदा साठी गोदावरीमाणिकराव लांब,पद्मिनी शंकरराव नागरगोजे,उषाबाई भगवान लांब विरुद्ध रोहिणी कृष्ण थोरात या चार महिला उमेदवारांमध्ये सरपंच पदासाठी लढत होती.यामध्ये रोहिणी कृष्णा थोरात यांची सरपंच पदी निवडून आल्या आहेत.जयजवान जय किसान पॅनलच्या सरपंच पदाच्या विजयी उमेदवार रोहिणी कृष्णा थोरात यांच्यासह परमेश्वर लांब,शितल थोरात,माया दहिरे,अशोक नागरगोजे, भागीरथी नागरगोजे असे एकूण पाच सदस्य विजयी झाले आहेत.सुधाकर बापू लांब यांच्या मार्गदर्शना खाली जय जवान जय किसान युवा पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे.या विजयाची मिरवणूक केज अंबाजोगाई रोडवरील कुंबेफळ येथील बनकरंजा फाट्यापासून सुरुवात करण्यात आली.विजयाची मिरवणूक ही सर्व गावा मध्ये रॅली काढूनगुलालाची उधळण करत डॉल्बीच्या तालावर विजयाचा जल्लोष कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला.सदरील रॅलीचा समारोप कुंभारवाडा या ठिकाणी करण्यात आला.
यावेळी मधुकर लांब, कमलाकर लांब, बालासाहेब नागरगोजे, बाबा पाटील,विक्रम थोरात,तेजस थोरात, विकास थोरात,अमोल थोरात यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक, युवक यांनी अथकपरिश्रम घेऊन जय जवान जय किसान पॅनलने घवघवीत यश संपादन केले आहे.
यावेळी आमच्या प्रतिनिधी शी बोलताना पॅनलचे मार्गदर्शक सुधाकर बापू लांब यांनी सांगितले की, राजकारण हे फक्त चार दिवसाचे असते बाकी सर्व समाजकारण असते मी गावातील सर्व तळागाळा तील नागरिकांना सोबत घेऊन गावचा सर्वांगीण विकास करणार आहे. त्यांनी गावातील सर्व मतदार बंधू भगिनीचे आभार व्यक्त केले आहे. येणाऱ्या काळात मतदारांना जो शब्द दिला आहे. तो मी प्रामाणिक पणे पाळणार आहे असे त्यांनी म्हटले आहे.
जय जवान जय किसान पॅनलचे प्रमुख सुधाकर बापू लांब यांनी गावातील सर्व समाज बांधवांना एकत्र करून पॅनल ची रचना केली व सर्व समाज बांधवांना विचारात घेऊन संपूर्ण मतदान प्रक्रिया विचार विनिमय करूनच पार पाडली त्यामुळे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती चा विजय झाला आहे. असे गावातील नागरिकांतून चर्चा ऐकण्यास येत आहे.