राजकीयवैभवशाली महाराष्ट्र न्युज

केज तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत रमेशराव आडसकर गटाचे वर्चस्व कायम

केज /प्रतिनिधी ( महादेव दौंड)

 

केज तालुक्यातील तेवीस ग्रामपंचायतीकरिता मतदान होऊन मतमोजणीतून भाजपा चे नेते रमेशराव आडसकर व मित्रपक्ष असलेल्या अजित पवार गटाचे बजरंग सोनवणे यांनी बहुतांश ठिकाणी विजय मिळवत तालुक्यात आपले वर्चस्व दाखवले आहे तसेच तालुक्याचे लक्ष असलेल्या आडस वर निर्विवाद वर्चस्व राखण्यात रमेशराव आडसकर यांना यश आले आहे मात्र नंदुरघाटमध्ये पंधरा वर्षापासून सत्तेत असलेल्या संतोष हांगे यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला आहे

तालुक्यातील 23 ग्रामपंचायतीकरिता 5 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन काल 6 नोव्हेंबर सोमवार रोजी तहसील कार्यालयात सकाळी दहाच्या सुमारास मतमोजणीस सुरुवात झाली जिल्हापरिषद सर्कल असलेल्या आडस , नांदुरघाट , बनसारोळा युसुफवडगाव , व होळयाप्रमुख गावात अनेक बड्या नेत्यांची राजकीय होमपीच होती त्यामुळे निवडणूक चुरशीच्या ठरणाऱ्या होत्या आडसमध्ये आडसकर समर्थक सरपंचपदाच्या उमेदवार सौ. योगेश्वरी व्यंकटेश देशमुख या प्रचंड मतांनी विजयी झाल्या तर बजरंग सोनवणे यांचे राजकीय होमपीच असलेल्या युसुफवडगाव येथून त्यांच्या गटाच्या सुलक्षणा महेश गायके यांनी सरपंचपदी विजय मिळवला नंदुरघाटमध्ये पंधरावर्षापासून सत्तेत असलेले भाजपाचे संतोष हांगे यांना मात्र यावेळी स्थानिक आघाडीने पराभूत केल्यामुळे हांगेना नामुष्की पत्करावी लागली आहे तर बनसारोळा या ठिकाणी अजित हनुमंत गोरे यांनी विजय मिळवला तसेच होळ येथील लढतीत माजी उपसभापती नेताजी शिंदेंना पराभव स्वीकारावा लागला आहे याठिकाणी अश्विनी सुरेश शिंदे या आडसकर गटाच्या उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या आहेत ईतर ग्रामपंचायतीत विजयी झालेल्या मध्ये

१) सासुरा- (गोविंद पाळवदे)

२) बनकरंजा-(रोहिणी कृष्णा थोरात)

३) लिंबाचीवाडी- (नामदेव कांबळे)

४) पिराचीवाडी- (जिजाबाई हरिभाऊ यादव)

५) कोल्हेवाडी-(अश्विनी मिसाळ) भाजपा

६) तरनळी- (महादेव प्रताप खेडकर)

७) मुलेगाव-(गोरख धनराज लाड)

८) उंदरी-(अश्विनी धनसंपत ठोंबरे) मुंदडागट

९) आडस-(योगेश्वरी व्यंकटेश देशमुख) आडसकर गट

१०) केकाणवाडी-(रूपाली संतोष केकाण) आडसकर गट

११) होळ- (अश्विनी सुरेश शिंदे) आडसकर गट

१२) बोरीसावरगाव- (वैजेनाथ रामराव देशमुख)

१३) युसुफवडगाव- (सुलक्षणा महेश गायके) सोनवणे गट

१४) नायगाव- (अश्विनी विवेक खोडसे)

१५) बनसारोळा-(अजित हनुमंत गोरे)

१६) माळेगाव-(रोहिणी कैलास गव्हाणे)

१७) सुर्डी-(महानंदा विश्वजीत राऊत) आडसकर गट

१८) शिरपूरा-(रविंद्र लांडगे)

१९) डोणगाव- (बळीराम हरिभाऊ भगत)

२०) काळेगावघाट- (अविनाश रामचंद्र गाताडे) भाजपा

२१) आरणगाव- (आशाबाई मारूती सिरसट)

२२) नांदुरघाट- (सुनिता युवराज जाधव)

२३) पिठ्ठीघाट- (चंद्रकला प्रकाश मस्के) यांचा समावेश आहे तहसीलदार अभिजित जगताप यांच्या देखरेखीखाली मतमोजणीची प्रक्रिया पार पडली त्यांना नायबतहसीलदार लक्ष्मण धस यांनी सहकार्य केले पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता. केज तहसील कार्यालयात निवडणूक निकाल प्रक्रिया धिम्या गतीने सुरू होती यामुळे संपूर्ण निकाल हाती यायला ईतर ठिकाणच्या पेक्षा काही वेळ जास्त गेल्याने निकालाची उत्सुकता पुर्ण व्हायला खूप वेळ लागला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.