केज तालुका दुष्काळ ग्रस्त म्हणून जाहीर करा.
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विधानसभा अध्यक्ष व तालुका अध्यक्ष सुरेश तात्या पाटील यांची मागणी

कृषी विश्व विशेष
केज /प्रतिनिधी
केज तालुका दुष्काळ ग्रस्त म्हणून जाहीर करून 100 % नुकसान गृहीत धरून पीक विमा अनुदानापैकी 25% अग्रीम अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करावे व कृषी सेवा केंद्रासाठी लावण्यात आलेल्या जाचक अटी तात्काळ रद्द करण्यात याव्यात अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विधानसभा अध्यक्ष व तालुका अध्यक्ष सुरेश तात्या पाटील यांनी केज तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे.
केज तालुक्यातील दुष्काळ कोरडा दुष्काळ परिस्थितीमुळे केज तालुक्यातील नदी नाले कोरडे आहेत इतकेच नव्हे तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होताना दिसून येत आहे .जनावरांना चारा व पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.केज तालुक्यातील तलाव व छोटे मोठे धरने कोरडे पडले असताना केज तालुका दुष्काळ ग्रस्त यादीतून वगळने म्हणजे केज तालुक्यातील जनतेची चेष्टा केल्यासारखीच म्हणावी लागेल.बीड जिल्ह्याचे पालक मंत्री धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्याचेच आहेत आणि आपल्या बीड जिल्ह्यातील केज तालुका वगळणे हे कितपत योग्य आहे. केज तालुक्यातील शेतकऱ्यावर अन्याय केला जात आहे.शेतकऱ्यांना लागणाऱ्या बी बियाणे विक्रेते यांना लावलेल्या जाचक अटी तात्काळ रद्द कराव्यात व शेतकरी व कष्टकरी यांच्या भावनाचा विचार करावा. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे असे निवेदनाद्वारे म्हटले आहे.या निवेदनावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते अनील गव्हाणे,हनुमंत घाडगे सर,युवराज मगर,मुजमुले अभय ,कसबे सचिन,लाड वैजीनाथ,बालासाहेब हादगावकर,अंगद धारेकर ,विश्वनाथ घारगावकर ,रुपसेन गव्हाणे,सादिक शेख , जगदीश आंधळकर,आसाराम करडकर, कृष्णा थोरात यांच्या सह्या आहेत.