शिक्षण महर्षी शामराव (दादा)गदळे व वै. बाळूताई शामराव गदळे यांचा पुण्यस्मरण कार्यक्रम संपन्न
शामराव दादा गदळे व बाळूताई शामराव गदळे यांच्या जीवनावरील पुस्तकाचे प्रकाशन रक्तदान शिबीर ,सर्वरोग निदान शिबिर संपन्न .

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष
केज/प्रतिनिधी (महादेव दौंड)
केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली येथे शनिवारी दि.4 नोव्हेंबर रोजी शिक्षण महर्षी शामराव (दादा) गदळे व बाळूताई शामराव गदळे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त सर्व रोग निदान शिबिर, रक्तदान शिबिर व ह.भ.प.विशाल खोले महाराज मुक्ताईनगर यांचे कीर्तन संपन्न झाले. ह. भ. प.विशाल खोले महाराज यांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून संतांचे विचार व शामराव दादा यांच्या विचारांची सांगड घालत विविध दाखले दिले. समाजामध्ये जीवन जगत असताना भविष्याच्या जडणघडणीचा विचार करणारे व्यक्तिमत्व जर कोणाचे असतील तर ते शामराव दादा यांचे होते कारण 1972 ला कठीण परिस्थितीतून शिक्षणाचं एक छोटसं रोपट लावलं परंतु आज या रोपट्याचा वटवृक्ष झालेला आपण पाहत आहोत या वटवृक्षाच्या सावलीतून कित्येक विद्यार्थी व विद्यार्थ्यांची जडणघडण झाली या संस्थेच्या माध्यमातून कित्येक जणांचे कुटुंब सुशिक्षित झाले असा विचार तोच करतो ज्यांना समाजासाठी काही करायचे असते. समाजासाठी समाजकार्य करणे इतके सोपे नसते कारण संत गाडगेबाबांनी ही अनेक यातना सहन करत समाजकार्य केले अशाच महात्म्यांचा विचार घेऊन शामराव दादा गदळे व बाळूताई शामराव गदळे यांनी समाज कार्य करत सर्व समाजासाठी शिक्षण संस्था उभी करून बालाघाटा मधील, डोंगराळ भागातील समाजाच्या प्रत्येक कुटुंबापर्यंत शिक्षण पोहोचवण्याचे महान कार्य यांनी केले. महाराजांनी कुटुंबप्रमुखाची परिस्थिती कशी असते ते सांगत असताना कुटुंब प्रमुखाला बऱ्याच यातना सहन करून आपलं कुटुंब पुढे घेऊन चालायचं असतं त्यामध्ये महाराजांनी भाजीत जरी मीठ जास्त झाले तरी त्या भाजीत मीठ जास्त आहे म्हणून न म्हणणारे व त्या भाजीमध्ये एक वाटीभर दही घेऊन त्या भाजीच्या मिठाचा खारटपणा कमी करून खाणारा कुटुंबप्रमुखच असतो. अशा या शामराव दादा गदळे यांनी कितीही अडीअडचणी आल्या तरी एक कुटुंब प्रमुख म्हणून न डगमगता या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली परंतु आज या संस्थेत काम करणारे सर्व कर्मचारी यांनी त्यांनी केलेल्या कार्याचा विचार करून प्रत्येक विद्यार्थ्यांना मनातून शिक्षण देण्याचे काम आपण सर्वांचे आहे. काम करत असताना कितीही खारटपणा आला तरी त्याला बाजूला सारून पुढे चालत आपले कार्य करत राहावे लागते. अशा प्रकारचे ह.भ. प.विशाल खोले यांनी आपल्या कीर्तनातून विद्यार्थी व विद्यार्थिनीना शिक्षणाबरोबर संतांच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास ही देणे गरजेचे असे सांगितले.
यानंतर शामराव दादा गदळे व बाळूताई शामराव गदळे यांच्या जीवनावर आधारित पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच दादांनी उभी केलेल्या संस्थेतून शिक्षण घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
सर्व रोग निदान शिबिर व रक्तदान शिबीर तज्ञ डॉ.आनंत मुळे, जनरल फिजिशियन डॉ.अमोल गीते अस्थिरोग तज्ञ, डॉ. सुरेश ठोंबरे नेत्ररोग तज्ञ डॉक्टर राम प्रभू तिडके जनरल सर्जन ,डॉ.लक्ष्मण वारे मुळव्याधी तज्ञ डॉ. बालासाहेब कराड हृदयरोग तज्ञ, डॉ.नागरगोजे, डॉ.गायकवाड. यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.
यावेळी हे.भ.प. महादेव महाराज चाकरवाडी, ज्ञानोबा माऊली बरड, चोले महाराज ढाकणे महाराज, तुकाराम महाराज आंधळे, पुरुषोत्तम महाराज ,दीपक मेटे महाराज, जोगदंड महाराज ,अर्जुन महाराज लाड ,अनुरथ महाराज,मा. शिक्षणाधिकारी हिरालाल कराड, भाजपचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, रमाकांत मुंडे, विक्रम बप्पा मुंडे, सरपंच अनिताताई दहिफळकर (गदळे)ऊपसरपंच येडू नाना ठोंबरे, मा. पंचायत समिती सदस्य दत्तात्रय (पिंटू) ठोंबरे, सरपंच सुरज पटाईत (विडा), ऋषिकेश पटाईत जालिंदर मोराळे, बालासाहेब मोराळे यांच्यासह अनेक सामाजिक,राजकीय, शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रातील मंडळीसह गावातील व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाची सांगता अन्नदान करून झाली या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी सकाळी तात्या सखाहारी (तात्या) गदळे , डॉ. शशिकांत दहिफळकर, डॉ.शालिनीताई कराड,शरद (बप्पा) गदळे , राहुल(भैय्या) गदळे, जयदत्त दहिफळकर यांनी अथक परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला. यावेळी शाम माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय व शाम कला व विज्ञान महाविद्यालय, पिंपळगाव हायस्कूल पिंपळगाव येथील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.