17 सप्टेंबर रोजी बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे संपन्न होत असलेल्या मराठवाडा मुक्ती दिन महोत्सवास उपस्थित राहण्याचे आवाहन* – संस्थापक अध्यक्ष – राजकुमार बापू धुरगुडे पाटील
पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात भव्य दिव्य अशा कार्यक्रमांचे आयोजन

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
आपणांस मराठवाडा मुक्ती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
पुणे जिल्हा प्रतिनिधी
!! कार्यक्रम पत्रिका !!
🌸 आदरपूर्वक निमंत्रण 🌸
मराठवाडा मुक्तिदिन महोत्सव – २०२५
सस्नेह नमस्कार,
प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी
दिनांक : १७ सप्टेंबर २०२५ रोजी
सायं ५.०० वा.
स्थळ : बालगंधर्व रंगमंदिर, पुणे
येथे मराठवाडा मुक्तिदिन महोत्सव
मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
आपली उपस्थिती या महोत्सवाचा आनंद आणि उत्साह द्विगुणित करेल, याची आम्हाला खात्री आहे.
सोबत कार्यक्रमाची निमंत्रणपत्रिका पाठवत आहोत.
आपण सहकुटुंब, सहमित्र उपस्थित राहावे, ही नम्र विनंती.
धन्यवाद!🙏
दिनांक 17 सप्टेंबर रोजी बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे मराठवाडा मुक्ती दिन महोत्सवास 2025 चे आयोजन प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मराठवाडा समन्वय समिती पुणे यांच्या वतीने करण्यात आले असुन उद्या संपन्न होत असलेल्या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आणि मराठवाडा मुक्ती संग्रामातील सर्व हुतात्म्यांच्या स्मृतींना उजाळा देऊन सदैव स्मरणात ठेवत वैभवशाली मराठवाड्यातील भुमिपुत्रांनी अविरत सुरू ठेवलेल्या मराठवाडा मुक्ती दिन महोत्सवाचे मुख्य आयोजक तथा संस्थापक अध्यक्ष मराठवाडा समन्वय समिती पुणे मा. श्री राजकुमार बापू धुरगुडे पाटील व सर्व पदाधिकारी यांच्या अथक परिश्रमाने अविरत सुरू असलेल्या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून राजस्थान राज्यचे राज्यपाल मा.श्री हरिभाऊ बागडे हे असणार आहेत तर प्रमुख अतिथी म्हणून सभापती विधानपरिषद महाराष्ट्र राज्य मा.प्रा. राम शिंदे हे तर सन्माननीय उपस्थित म्हणून कुलपती एम.जी एम विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर यांची विशेष उपस्थिती लाभणार असुन यावेळी रणगाथा शौर्याची हा प्रेरणादायी शाहिरीचा कार्यक्रम होणार आहे व विविध क्षेत्रातील मान्यवरांना मराठवाडा भुषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे तरी पुणे येथे संपन्न होणाऱ्या कार्यक्रमास आपण आपला अमूल्य वेळ देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी व सुंदर अशा कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मराठवाडा समन्वय समिती पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.