
जनविकास मध्ये आंतरमहाविद्यालयीन ज्युडो क्रीडा स्पर्धा संपन्न
केज दि २६(प्रतिनिधी)
तालुक्यातील बनसारोळा येथील जनविकास महाविद्यालयात डॉ. बा.आं.मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद व जनविकास महाविद्यालय, बनसारोळा यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरमहाविद्यालयीन ज्युडो क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब गोरे हे होते तर उद्घाटक म्हणून प्राचार्य डॉ. गौतम पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य, डॉ. बा. आं. मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद हे होते यावेळी मंचावर डॉक्टर दिखखत, क्रीडा संचालक,डॉ. बा. आं. मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, डॉ. सानप , डॉ.धोंडे व महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. प्रकर्ष काकडे हे उपस्थित होते. यावेळी बोलताना उद्घाटक प्राचार्य डॉ. गौतम पाटील यांनी ज्युडो सारखे खेळ ग्रामीण भागात होणे आवश्यक असून अशा खेळाबद्दल ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांत आवड निर्माण करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी डॉ. दिखखत , डॉ. सानप , डॉ.धांडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ. बाबासाहेब गोरे यांनी ग्रामीण भागासाठी नवीन असलेल्या ज्युडो क्रीडा प्रकारात विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आपला नावलौकिक करण्याचे आव्हान त्यांनी विद्यार्थ्यांना केले. अध्यक्षीय समारोपानंतर प्रत्यक्ष स्पर्धेला सुरुवात झाली या स्पर्धेत विविध महाविद्यालयातील 47 स्पर्धकांनी भाग घेतला होता. स्पर्धेनंतर पारितोषिक वितरण कार्यक्रम घेण्यात आला यात सर्व विजेत्या स्पर्धकांना प्राचार्य डॉ. बाबासाहेब गोरे,डॉ. दिखखत , डॉ. सानप , डॉ, धांडे , डॉ. रणमाळ व डॉ. प्रकर्ष काकडे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते पारितोषक देण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. सतीश कदम यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. नंदकिशोर चिताडे व प्रा. रवी रोकडे यांनी मानले. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विद्यापीठाचे क्रीडा संचालक, पंच व इतर स्टाफ तसेच महाविद्यालयाचे क्रीडा संचालक,सर्व प्राध्यापक कर्मचारी विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.