केज येथे ठाकुर रामकृष्ण परमहंस परिवाराच्या वतीने गुरु पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा
वैभवशाली महाराष्ट्र न्यूज सामाजिक

सामाजिक व सांस्कृतिक विशेष
केज /प्रतिनिधी
केज शहरातील वृंदावन धाम येथे ठाकुर रामकृष्ण परमहंस परिवाराच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहपुर्ण वातावरणात संपन्न झाला.ठाकुर रामकृष्ण परमहंस परिवाराची स्थापना वै.प.पु. वासुदेवराव खंदारे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाने झाली.ठाकुर रामकृष्ण परमहंस,शारदामाता, स्वामी विवेकानंद व वै.प.पु.वासुदेवराव खंदारे गुरुजी यांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करुन वंदन करण्यात आले.त्यानंतर आईंच्या पाद्यपुजनानंतर सामुहिक रुद्राष्टक पठण,हनुमान चालीसा पठण,हरीपाठ घेण्यात आला.यावेळी ठाकुर रामकृष्णपरिवाराचे महाराष्ट्रातुन सर्व साधक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.यावेळी www.harivachan.org या वेबसाईटचे उदघाटन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. या वेबसाईटवर ठाकुर रामकृष्ण परिवाराचे सर्व उपक्रम दाखविण्यात येणार आहेत.तसेच गुरु पौर्णिमेचे औचित्य साधून सौ.रमाभाभी रिणवा यांनी स्वहस्तक्षरात लिहिलेल्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचे अनावरण मान्यवरां च्या शुभहस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाचे सुञसंचालन ठाकुर रामकृष्ण परिवाराचे ह.भ.प.श्री. समाधान महाराज शर्मा यांनी केले. यावेळी प.पू. समाधान महाराज शर्मा यांनी सद्गुरू खंदारे गुरुजींनी आयुष्य जगत असताना जी आचारसंहिता घालून दिलेली आहे त्याचे सर्व साधकांनी तंतोतंत पालन करावे असे आवाहन केले.महाप्रसादाने गुरुपोर्णिमा उत्सव कार्यक्रम संपन्न झाला.