भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम
न्यू सिद्धार्थ ग्रुप नवा मोंढा आणि हमाल मापाडी युनियन यांची बांधिलकी

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष
अंबाजोगाई (वार्ताहर)
शहरातील न्यू सिद्धार्थ ग्रुप, नवा मोंढा, मुकुंदराज कॉलनी आणि हमाल मापाडी युनियन, अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी ही भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकी जोपासत विविध उपक्रम राबविण्यात आले. अन्नदान करून तसेच विविध उपक्रम राबवून महामानवांना मानवंदना देण्यात आली.
याबाबत न्यू सिद्धार्थ ग्रुप, नवा मोंढा येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बालासाहेब आदमाने यांनी सांगितले की, अंबाजोगाई शहरात १४ एप्रिल रोजी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा १३३ वा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी मधुकर सखाराम आदमाने यांच्या हस्ते व संजयदादा सरवदे, संजयभाऊ साळवे, जीवन गव्हाणे, अकबर पप्पूलाले गवळी, मनोज सोनवणे, आकाश साळवे, बालासाहेब शिंदे, अनिस शेख, गौतम खरात, सुरेश वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. न्यू सिद्धार्थ ग्रुप, नवा मोंढा आणि हमाल मापाडी युनियन, अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. यातील अन्नदान ५ क्विंटल खिचडीचे वाटप हा उपक्रम संपूर्ण अंबाजोगाईकरांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. अल्पोपहार म्हणून सर्वांना सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत खिचडी वाटप करण्यात आली. राजेभाऊ साळवे यांच्या हस्ते खिचडी वाटप आणि पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. विशेष म्हणजे शहरात येणाऱ्या सर्व आंबेडकरी अनुयायी यांचेसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यावर्षी ही करण्यात आली होती. सोनबा येवले पानपोईचे हे ११ वे वर्ष आहे. मान्यवरांकडून छत्रपती शिवरायांचे अंगरक्षक, वीर लढवय्ये जिवाजी महाले चौकाच्या नामफलकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जयंतीनिमित्त नवा मोंढा येथे भव्य मिरवणुक काढण्यात आली. मोठ्या थाटामाटात आणि आतिषबाजीच्या गजरात आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व महामानवांचे विचार समाजासमोर घेऊन जाणारे आकर्षक नृत्य, प्रबोधनपर देखावे, लेझीम हे पारंपरिक कला प्रकार सादर करण्यात आले. या मिरवणुकीतील देखाव्यांनी लहान मुले, महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक, मान्यवर या सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. विशेष म्हणजे सर्व जाती – धर्माच्या लोकभावनांचा आदर करीत सदर मिरवणूक शांततामय वातावरणात काढण्यात आली. जयंती उत्सवाचे सोशल मीडियावरून लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. या कार्यक्रमास सचिन विलासराव जाधव, माजी नगरसेवक दिनेश भराडीया या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. यासाठी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बालासाहेब आदमाने यांनी विशेष प्रयत्न केले. तर या सर्व कार्यक्रमांच्या यशस्वितेसाठी जयंती उत्सव समितीचे सदस्य संजय भाऊ साळवे, दादा आदमाने, दादासाहेब जोगदंड, अमोल हातागळे, विजय आदमाने, बाळासाहेब धबडगे, अक्षय आदमाने, अनिल सहजराव, राजेभाऊ साळवे, बाळू गडसिंग, अशोक सहजराव, अरूण आदमाने, ज्ञानोबा धबडगे, अशोक गडसिंग, बाळासाहेब सरवदे, प्रशिक गडसिंग, नितिन शेळके, गौतम आदमाने, सचिन हातागळे, गणेश वायदंडे, रूपेश मस्के, सोनु बनसोडे, हनुमंत यादव, बाबा ढवारे, उमेश सहजराव, सोनू ढवारे, धनराज कलसे, कासिम गवळी, ओम गोरे, साहिल सोनवणे, संजय आदमाने, आर्यन गडसिंग, अविनाश साळवे, नितीन खलसे, अतुल शेळके, लखन आदमाने, सुशिल सरवदे, प्रितम मांदळे, मिका गवळी, स्वप्निल मस्के, ज्ञानोबा जोगदंड, संदेश पवार, अभिजीत बनसोडे, देव यादव, संकेत मस्के, अक्षय मस्के, आर्यन आदमाने, प्रेम आदमाने, राज आदमाने, बंडु मस्के, विशाल उपाडे, सुंदर मामा कांबळे, अनुरथ भाऊ उपाडे, प्रभु खलसे, अंकुश शिनगारे, मारूती जोगदंड, करीम गवळी, मारूती गोचडे, जलाल गवळी, मधुकर शिंदे, परमेश्वर शिंदे, राजेभाऊ शिंदे, मुल्लाभाई गवळी, नारायण जोगदंड, अर्जुन पौळे, अनिल मिसाळ, दिलीप सुरवसे, अशोक सुर्यवंशी, शिरू गायकवाड, चंद्रकांत वाघमारे, संतोष समुखराव तसेच हमाल मापाडी युनियन, अंबाजोगाई आणि न्यू सिद्धार्थ ग्रुप, नवा मोंढा येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी, सदस्य आणि युवकवर्ग यांनी पुढाकार घेतला.