दैठणा येथे छत्रपती शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न
छत्रपती शिवजन्मोत्सव सोहळा 2023

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
काशीनाथ कातमांडे
केज /प्रतिनिधी ग्रामीण
केज तालुक्यातील मौजे दैठणा येथे प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (शिवजन्मोत्सव) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे डॉ उत्तम खोडसे साहेब आणि गोविंद नाना शिनगारे यांच्या हस्ते छत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.त्यानंतर प्रमुख पाहुण्याचे सत्कार करण्यात आले.सार्वजनिक शिवजन्मोत्सव निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्यामध्ये गायन स्पर्धा ,दांडिया पथक, लेझीम पथक, वाचन स्पर्धा, नृत्य स्पर्धा ,रांगोळी स्पर्धा आयोजन करण्यात आलेले होते. त्यामध्ये गावातील शिवप्रेमी तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्तम प्रकारे प्रतिसाद दिला. यावेळी प्रमुख उपस्थिती डॉ.उत्तम खोडसे साहेब,गोविंद नाना शिनगारे,अग्रवाल कुरुंद,सरपंच मनोज राऊत उपसरपंच सुरज मुळे,अंकुश मुळे,उमेश गोरे,लहु मुळे,शाहु कातमांडे,कृष्णा कातमांडे,आनंद कातमांडे,मनोज कातमांडे,सुधीर मुळे,वैभव मुळे,विशाल मुळे,बालाजी मुळे,अनिल कातमांडे यांच्यासह सार्वजनिक जयंती उत्सव समिती,तरुण मित्र मंडळ व गावकरी उपस्थित होते .