भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या इंजि.सादेक इनामदार यांचा माजलगाव विधानसभे साठी उमेदवारी अर्ज दाखल

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
बीड /डॉ जावेद शेख
धारूर येथील भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे मराठवाडा अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते इंजि सादेक इनामदार यांनी माजलगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांच्या उमेदवारीमुळे माजलगाव विधानसभा मतदार संघात परिवर्तनाचे वारे वाहणारा असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रस्थापित आणि धनदांडगे उमेदवारांना मतदार राजा घरचा रस्ता दाखवणार असल्याचे एकंदरीत चित्र मतदार संघामध्ये दिसून येत आहे.
धारूर येथील सामाजिक कार्यकर्ते सादेक इनामदार यांनी 29 ऑक्टोबर मंगळवार रोजी धारूर शहरातून रॅली काढून माजलगाव विधानसभा निवडणुकीमध्ये उडी मारत उमेदवारी अर्ज दाखल केला .यांच्या उमेदवारीमुळे माजलगाव विधानसभा मतदार संघातील निवडणुकीकडे पूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असून या मतदारसंघात अटीतटीचा सामना होणार असून यामध्ये इनामदार यांचा विजय निश्चित असल्याचे मतदारांच्या चर्चेतून दिसून येत आहे. इनामदार हे माजलगाव मतदार संघातील गोरगरिबांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम ते अनेक वर्षापासून करतात. गरिबांचे प्रश्न अनेक मार्गी लावले आहेत. त्यांना मानणारा एक वर्ग असून मतदानातून त्यांना आशीर्वाद मिळेल अशी चर्चा मतदारसंघांमध्ये आहे. यावेळी माजलगाव विधानसभा मतदारसंघाचा पाहिजे तसा विकास झालेला नाही विकासाच्या नावावर माजलगाव विधानसभा मतदार संघ भकास करून टाकला आहे या मतदारसंघात बेरोजगार ना रोजगाराच्या सुविधा उपलब्ध नाहीत शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न तसाच आ वासून उभा आहे माजलगाव विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष सादेक इनामदार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांना जनतेतून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे.