मराठा, मुस्लिम, ब्राह्मण तथा अन्य खुल्या प्रवर्गाला ईडब्ल्यूएसचा मोठा फायदा – सलीम जहाँगीर
पंकजाताईंची भेट घेऊन केले अभिनंदन

वैभवशाली महाराष्ट्र न्युज
बीड ( प्रतिनिधी ) आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ईडब्ल्यूएस 10 टक्के आरक्षण देण्याच्या केंद्र सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे मराठा, मुस्लिम, ब्राह्मण तथा अन्य खुल्या प्रवर्गाला ईडब्ल्यूएसचा मोठा फायदा होणार असल्याचे भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी म्हटले आहे. यासंदर्भात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांची भेट घेऊन सलीम जहाँगीर यांनी ताईंचे अभिनंदन केले.ईडब्ल्यूएस दहा टक्के आरक्षणाचा निर्णय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी 2019 मध्ये खुल्या प्रवर्गासाठी घेतला होता. मराठा , मुस्लिम , ब्राह्मण यासह अन्य खुल्या प्रवर्गासाठी हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला होता. मात्र या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यासंदर्भात सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी घेतलेला 10 टक्के आरक्षणाचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे आता खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या घटकांसाठी शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आता 10 टक्के आरक्षण मिळणार आहे. यासंदर्भात प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी व सरकारने घेतलेला निर्णय पूर्ववत झाल्याबद्दल पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांची मुंबईत भेट घेऊन सलीम जहाँगीर यांनी ताईंचे अभिनंदन केले. यावेळी सलीम जहाँगीर यांनी पंकजाताईंशी विविध विषयांवर चर्चा केली. मराठा, मुस्लिम, ब्राह्मण तथा खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकांत उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून या निर्णयाबद्दल भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी केंद्र सरकार आभार मानले आहेत.