अब्बू मुझे आर्मी मे जाना है…..!
प्रजासत्ताकदिनी छोट्या आर्मीने सर्वांना केलं आकर्षित

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज शैक्षणिक
बीड/प्रतिनिधी
बीड तालुक्यातील नेकनूर येथील जि.प.माध्यमिक शाळा येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना सेवानिवृत्त मुख्याध्यापक शेख दस्तगीर अब्दुल जि .प.माध्यमिक शाळा नेकनूर येथे आपला नातू शेख उमरैन जावेद यास ध्वजारोहन करण्यासाठी घेऊन गेले असता शेख उमरैन आर्मीच्या ड्रेसिंग मध्ये गेला होता .त्यास पाहून प्रजासत्ताक दिनी आलेल्या सर्वांच्या नजरा त्याच्याकडे लागल्या होत्या.तो असा दिसत होता की,एक छोटा आर्मी देश सेवा करण्यासाठी सज्ज झाला आहे.त्यास पाहून मुख्याध्यापक व शिक्षक तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी उमरैन चा सत्कार केला.शाळेतील प्रत्येक विध्यार्थी व विद्यार्थिनीना त्याच्यासोबत फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही.सर्वांनी उमरैन सोबत फोटो काढले .जि.प.माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक अझहर सर यांनी उमरैन चा सत्कार केला.व गावातील प्रतिष्ठित नागरिक मूनवर जागीरदार, ठोंबरे सर,साबेर , यांनी बक्षिसे दिली.त्यामुळे उमरैन चा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
————————–
म्हणतात ना,” बाळाचे पाय पाळण्यात दिसतात” अगदी त्याच प्रमाणे
माझा मुलगा शेख उमरैन हा फक्त 6 वर्षांचा आहे . त्याचा एक मौजम मामा आर्मी मध्ये पंजाब येथे देश सेवा करत आहे त्यास पाहून त्याला लहानपणापासूनच देश सेवा करण्याची आवड आहे. तसेच मोबाईल वर व्हिडीओ ही आर्मीचेच पाहतो. त्याचे राहणीमान व विचारातून तो देश सेवाच करेल असे आम्हाला वाटत आहे,त्याचा आम्हाला अभिमान वाटतो !
पालक –प्रा.डॉ.जावेद शेख
दहीफळ (वड)ता.केज जि. बीड