राजर्षी शाहू विद्या मंदिर शाळेतील पालक मेळाव्यास पालकांचा उत्स्फुर्त सहभाग
पालक मेळावा शैक्षणिक केज

वैभवशाली महाराष्ट्र न्युज
केज प्रतिनिधी
—————————
प्रतिनिधी-केज शहरातील राजर्षी शाहू विद्या मंदिर शाळेत या शैक्षणिक वर्षाचा पहिला पालक मेळावा घेण्यात आला.शाळा,पालक व विद्यार्थी यांच्या समन्वयातून शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याचे शैक्षणिक प्रगतीचे ध्येय समोर ठेवून काम करण्याचा यावेळी संकल्प करण्यात आला.
पालक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी स्वामी दयानंद प्रतिष्ठान केज संस्थेचे अध्यक्ष तथा माजी सभापती ऍड.राजेसाहेब देशमुख यांची उपस्थिती होती तर प्रमुख उपस्थिती मध्ये संस्थेचे सचिव जी.बी.गदळे,संचालक माधवराव मोराळे,अशोकराव डांगे,शिक्षणप्रेमी हनुमंत भोसले,शाळेच्या मुख्याध्यापिका बी.बी.चाटे यांची उपस्थिती होती.
यावेळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पुजनाने पालक मेळाव्याची सुरुवात करण्यात आली.यावेळी बोलताना हनुमंत भोसले यांनी शाळा,शिक्षक व पालक यांच्या समन्वयातून विद्यार्थ्यांची प्रगती साधली जाऊ शकते.विद्यार्थ्याचा कल व बुद्धिमत्ता पाहून पालकांनी अपेक्षा ठेवली पाहिजे असे प्रतिपादन केले.यावेळी बोलताना जी.बी.गदळे यांनी शाळेच्या प्रगतीचे कौतुक करुन विद्यार्थी गुणवत्ता विकासासाठी पालक व शिक्षक यांना मोलाच्या सुचना केल्या.अध्यक्षीय समारोपात ऍड.राजेसाहेब देशमुख यांनी शाळेतील उपक्रमांचे कौतुक करीत समाधान व्यक्त केले त्याचबरोबर शाळेच्या इमारत बांधणीसाठी सकारात्मक पाऊल उचलणार असल्याचे सांगितले.यावेळी पालक प्रतिनिधी म्हणून डॉ.दत्तात्रय ठोंबरे यांनी शाळा व विद्यार्थी यांविषयी मनोगत व्यक्त केले तसेच उपस्थित इतर पालकांनीही आपले विचार मांडले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व्हि.बी.यादव,प्रास्ताविक बी.डी.चौधरी यांनी केले.पालक मेळाव्यात मातापालक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक एस.ए.डापकर,ए.डी.देशमुख,आर.एस.क्षीरसागर, जी.बी.डिरंगे व जे.आर.मस्के यांनी परिश्रम घेतले.