आपला जिल्हामहाराष्ट्रसामाजिक
उंदरी येथे मराठा बांधवांनी केला आनंदोत्सव साजरा
मराठा आरक्षण लढ्याला मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली यश संपादन झाल्याबद्दल गावात पेढे वाटून जल्लोष.

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष
केज प्रतिनिधी
केज तालुक्यातील मौजे उंदरी येथे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला आरक्षण मिळाल्या बद्दल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पेढे वाटून गुलाल उधळून फटाके फोडून घोषणा देऊन आनंद उत्सव जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी मराठा आरक्षण लढ्यातील सक्रीय सहभागी असणारे व मौजे उंदरीचे भुमिपुत्र बीड जिल्हा छावा प्रमुख शिवाजी दादा ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली यावेळी विजयी गुलाल उधळून करण्यासाठी सर्व गावकरी व मराठा समाजातील समाज बांधवांची विशेष उपस्थिती होते . सर्वांनी निर्णय झाल्याचे कळताच भरभरून शुभेच्छा देत आनंदोत्सव साजरा केला .