धीम्या गतीने रस्त्याचे काम; प्रवाशांचे बेहाल तत्काळ रस्त्याचे काम पूर्ण करा – कैलास चाळक
रस्त्याचे काम तात्काळ करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)पक्षाची मागणी

केज :- प्रतिनिधी
केज ते कानडीमाळी रस्त्याचे काम सुरु असून हे काम अत्यंत धीम्या गतीने व निकृष्ठ दर्जाचे होत असल्याने लोकांना रहदारी साठी नाहक त्रास होत आहे.त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,केज ते कानडीमाळी रस्त्याच्या कामासाठी रस्ता खोदल्यामुळे नालीतील पाण्यामुळे व पावसामुळे रस्त्यावर पूर्णपणे चिखल झाल्याने रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे.लहान वाहनधारक घसरून पडण्याचे प्रमाण वाढले आहे.तसेच ये जा करणाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.त्यामुळे या रस्त्याची एक बाजू प्रवासासाठी खुली करावी अन्यथा खा.बजरंग बाप्पा सोनवणे व मा. आ. पृथ्वीराज साठे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाव्दारे दिला आहे.
निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार युवक तालुकाध्यक्ष कैलास चाळक,शहराध्यक्ष इमाद फरोकी, विष्णू पाटील,दीपक राऊत,ऋषीकेश जाधव,मेटे सुरेश, यश काळे,मोहम्मद हरणमारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.