८ वे विश्व शब्द मराठी साहित्य संमेलन मॉरिशसला
मॉरिशस संमेलनात दगडू लोमटे यांचा सहभाग

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
देश विदेश
अंबाजोगाई – प्रतिनिधी
शब्द परिवार आयोजित आठवे विश्व शब्द साहित्य संमेलन यावर्षी १२ ते – १७ जानेवारी २०२४ रोजी मॉरिशस या देशात होत आहे. यापूर्वी सातवे शब्द साहित्य संमेलन नेपाळ येथे पार पडले होते. गेल्या संमेलनाचे मावळते अध्यक्ष दगडू लोमटे हे या संमेलनास उपस्थित राहणार आहेत.
यावर्षी ८ व्या विश्व शब्द साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्राचार्य डॉ. अनिल गजभिये – इंदोर हे असतील तर उद्घाटक सुप्रसिध्द चित्रकार, कलावंत विजय राऊत – मुंबई हे असतील. उद्घाटन सत्राचे अध्यक्ष प्रकाश निर्मळ, भाषा अभ्यासक, पुणे हे असणार आहेत. कवी संमेलन, गझल संमेलन, परिसंवाद, कथाकथन व पर्यटन असा भरगच्च कार्यक्रम आयोजित केला असल्याचे शब्द परिवाराचे संजय सिंगलवार व शशी डंभारे यांनी जाहीर केले आहे.
यापूर्वीचे मावळते संमेलन अध्यक्ष दगडू लोमटे, आणि ईतर माजी संमेलन अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. दगडू लोमटे यांनी यापूर्वी श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश या देशांना सामाजिक उपक्रमा अंतर्गत भेटी दिल्या आहेत. या वर्षी ते संमेलना निमित्त मॉरिशसला जात आहेत.