मराठवाडा शिक्षक संघाची केज तालुका कार्यकारिणीची निवड
वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
केज प्रतिनिधी
मराठवाडा शिक्षक संघाची केज तालुका कार्यकारिणी आज निवड करण्यात आली. तालुका अध्यक्ष पदी जीवनराव थोरात तर तालुका सचिव पदी बाळासाहेब टिंगरे यांची निवड करण्यात आली
मराठवाडा शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष तथा मार्गदर्शक डी.जी. तांदळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि संघटनेचे जिल्हाध्यक्ष कालिदास धपाटे, जिल्हा सचिव गणेश आजबे , संघटनेचे मार्गदर्शक तथा जीवन विकास शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव जी.बी गदळे , जिल्हा कार्यकारिणी सदस्य हनुमंत घाडगे व माजी तालुका अध्यक्ष लक्ष्मणराव जाधव , स्वामी विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक गोपळघरे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वामी विवेकानंद विद्यालय केज येथील येथे मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हा प्रतिनिधी, सभासदांच्या झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. बैठकीचे प्रास्तविक जिल्हा सचिव गणेश आजबे यांनी केले त्यांनी नुतन कार्यकारिणीचा प्रस्ताव मांडला. तालुका उपाध्यक्ष अनुरथ मुंडे, मंगेश गिरी ,सहसचिव पदी जयपाल मस्के श्रीमती एस.एल.सि रसट, कोषाध्यक्ष रामदास कुंभार, प्रसिद्धी प्रमुख अनंत तरकसबंद यांची सदस्य पदी अंगद सावंत, नंदकुमार मस्के, अमोल कापसे,एस. डी. राऊत यांची निवड करण्यात आली यावेळी श्रीमती शेख मॅडम, दिगंबर सुंकावर, अशोक बोबडे,वाघमारे सूर्यकांत,सांगळे सर, इंगळे सर, सत्वधर सर, मायकर सर,शिनगारे सर, मडके सर यांनी उपस्थित पाहुणे व जिल्हा प्रतिनिधींचे स्वागत केले व कार्यक्रमाचे संचलन , आभार हनुमंत घाडगे यांनी केले