खा.सोनवणेंनी लक्ष घातले अन् चिंचोलीमाळी सबस्टेशनला मिळाले रोहित्र
सबस्टेशनला मिळाले ५ एमव्हीए क्षमेचे ट्रान्सफार्मर

केज तालुका प्रतिनिधी
केज: चिंचांगली माळी येथील सबस्टेशन येथे ५ एमव्हीए क्षमतेचे ट्रान्सफार्मर बसविण्याची मागणी शेतकऱ्यांकडून आल्यानंतर खा.बजरंग सोनवणे यांनी महावितरण विभागाचे मुख्यअंभियता लातूर यांना पत्र लिहले होते. यानंतर दि.९ रोजी याठिकाणी रोहित्र मिळाले असून याबाबत ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.
चिंचोली माळी येथे महावितरणचे सबस्टेशन आहे. मात्र, कमी क्षमतेच रोहित्र याठिकाणी असल्याने अनेकदा अडचणीचे ठरत होते. सदरील ठिकाणी ५ एमव्हीए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर मिळवून देण्यात यावे, अशी ग्रामस्थ आणि परिसरातील शेतकऱ्यांची मागणी होती. दरम्यान, यासाठी खा.बजरंग सोनवणे यांनी महावितरणचे मुख्य अभियंता यांना पत्र देऊन सदरील काम मार्गी लावावे, असे म्हटले होते. यानंतर ५ एमव्हीए अतिरिक्त पॉवर रोहित्रचे काम करण्यासाठी लागणाऱ्या परवानग्या देण्यात यावा, अशा सुचनाही देण्यात आल्या होत्या. सदरील कामाची प्रशासकिय मान्यता आल्यानंतर परवानग्यांचा विषय समोर आला होता. यातही खा.बजरंग सोनवणे यांनी पाठपुरावा केला. यानंतर दि.९ जून रोजी रोहित्र बसविण्यात आले. आता रोहित्र बसविल्याने उच्च दाबाने विद्यूत पुरवठा होणार आहे. शिवाय शेतकऱ्यांनाही याचा मोठा फायदा होणार आहे. दरम्यान, खा.सोनवणे यांनी शेतकऱ्यांच्या विषयात लक्ष घालून बारकाईने पाठपुरावा केल्याबद्दल शेतकऱ्यांनी आभार मानले आहेत.