आपला जिल्हाआरोग्य व शिक्षण

श्री संस्कार इंग्लिश स्कूलच्या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा संपन्न.

श्री संस्कार इंग्लिश स्कूल चे पालकत्व स्विकारणार- खासदार बजरंग बप्पा सोनवणे

केज/प्रतिनिधी

 

केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील श्री संस्कार इंग्लिश स्कूल या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे ईंग्रजी शिक्षण देण्यासाठी नव्याने सुरू झालेल्या व अल्प कालावधीतच नावलौकिक मिळविलेल्या श्री संस्कार इंग्लिश स्कूल च्या इमारतीचे उद्घाटन शनिवारी दुपारी 12.30 वाजता बीड जिल्ह्याचे दबंग खासदार मा बजरंग बप्पा सोनवणे यांच्या हस्ते संपन्न झाले.

 

या वेळी बोलताना खासदार बजरंग बप्पा सोनवणे म्हणाले लोकसभा मतदार संघाचे पालकत्व स्विकारले आहे त्यामुळे मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे संपर्कासाठी वेळ मिळत नाही परंतु चिंचोलीमाळी व विडा जिल्हा परिषद सर्कलचे उपकार जन्मभर विसरणार नाही कारण मला या सर्कल मधुन सातत्याने मताधिक्य दिले असून जिल्हा परिषद मध्ये काम करण्याची संधीमिळाली आहे. तसेच श्री संस्कार इंग्लिश स्कूलचे देखील पालकत्व स्वीकारले आहे व शाळेच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले

यावेळी या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बीड जिल्ह्याचे खासदार श्री. बजरंग सोनवणे हे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सौ.रोहिणीताई सुनील देशमुख सरपंच चिंचोलीमाळी या होत्या

तर प्रमुखपाहुणे म्हणून

मा.आ.सौ.संगिताताई ठोंबरे, सौ.मनिषाताई कुपकर, गट शिक्षण अधिकारी लक्ष्मण बेडसकर, ह.भ.प. भगवान महाराजशास्त्री, ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज गिरी, पोलिस निरीक्षक वैभव पाटील, शिवाजी दादा ठोंबरे,भाई, मोहन गुंड, गोविंद नाना शिनगारे, अरविंद भैय्या थोरात, चत्रभुज खोडसे, पिंटु ठोंबरे, भाऊसाहेब गुंड, बाळासाहेब गाढवे सौ.शितलताई लांडगे, ज्ञानेश्वर चवरे, ह.भ.प.सुनील महाराज गालफाडे, बापुसाहेब भुसारी, शिवाजी चाटे, मंजुलदास भिसे, नितीन सुरवसे, गणेश सत्वधर, संदिप जोशी, आबा महाराज मेहरकर आदीमान्यवर यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.खा.बजरंग सोनवणे यांच्या हस्ते नुतन इमारतीची फित कापून उद्घाटन संपन्न झाले. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. याकार्यक्रमा साठी समस्त गावकरी मंडळी,मित्र परिवार, पत्रकार, विविध शिक्षण संस्था चालक, कॉम्प्युटर संस्था चालक व विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी आवर्जून उपस्थित होते.प्रमुख पाहुणे यांनी श्री संस्कार इंग्लिश स्कूलच्या सर्व टीमला शुभेच्छा दिल्या.

सुरसंगम कला पथक यांनी उत्कृष्ट गितांचे सादरीकरण अनिल वैरागे, स्नेहलताई यांनी केले.

यावेळी बप्पा चंदनशिव, दिलीप तात्या देशमुख, अरुण काळे, शिवाजी गायकवाड, शहाजी अप्पा गलांडे, भुजंग गलांडे, चंद्रकांत भुजबळ, धिरज वनवे, रामराजे नखाते, गुलाब पठाण, अनिल राऊत, सचिन राऊत, रविराज कापरे, रामदास सपाटे, प्रमोद नखाते पत्रकार चंद्रकांत पाटील, रविंद मेटे, जोतिराम सावंत, सचिन साखरे, पांडुरंग कसबे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षीका पुजा देशमुख, सोनाली खंदारे, निलम जोगदंड, रेश्मा गायकवाड, प्रियंका शिंदे, यांनी विशेष परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष अनिल गलांडे केले तर आभार प्रदर्शन प्रिन्सिपल सिमा काळे यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.