अंबाजोगाई नगरपरिषदेने राबविला ‘एक पेड माँ के नाम’ हा उपक्रम
जागतिक पर्यावरण दिनी केले ४० रोपांचे वृक्षारोपण

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अंबाजोगाई नगरपरिषदेने ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमातून जागतिक पर्यावरण दिनी सर्व्हे नंबर-१७ मध्ये विविध प्रजातींच्या ४० रोपांचे वृक्षारोपण केले. वर्षभर ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून वृक्ष संवर्धनास चालना मिळणार असून व वृक्ष संगोपन ही करण्यात येणार आहे.
येथील नगरपरिषद अंबाजोगाई (जि.बीड) यांच्या मार्फत गुरूवार, दिनांक ५ जुन २०२५ रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अमृत व दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नगरी उपजीविका अभियान (डीएवाय – एनयुएलएम) कृतीसंगम उपक्रमांतर्गत सर्वे नंबर-१७ या ठिकाणी ‘एक पेड माँ के नाम’ हा उपक्रम राबविण्यात आला. या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी अंबाजोगाई नगरपरिषदचे, कार्यालयीन अधिक्षक शेख इफ्तेखार, सय्यद अन्वर, शहर अभियान व्यवस्थापक दिलीप तांबारे, शहर समन्वयक शेख समीरोद्दीन, नगररचनाकार ज्ञानेश्वर पोटे, शहर अभियंता किशोर मुंडे, धनंजय चव्हाण, लखन ओहाळ, स्वच्छता विभागाचे राजकुमार जोगदंड, सुपरवाझयर मल्हारी जोगदंड व इतर कर्मचारी तसेच शहरस्तर संघाच्या अध्यक्षा श्रीमती रोहिणी कडेकर, सिआरपी निर्गुण हावळे, सीमा खतीब, मनीषा वाघमारे, तसेच आनंदी, आदिशक्ती, आईसाहेब, प्रगती इत्यादी स्वयंसहायता महिला बचत गटांतील सदस्यांनी उत्स्फूर्तपणे वृक्षारोपण केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी स्वच्छता विभागाचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. शहरातील विविध प्रभागांमध्ये तसेच शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालयातील परिसरामध्ये वृक्षारोपण करण्याची परवानगी दिल्यास ‘एक पेड माॅं के नाम’ हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार आहे. सदरील वृक्षारोपण केलेल्या वृक्ष रोपांचे एक वर्ष कालावधीसाठी संगोपन करण्याची जबाबदारी देखील स्विकारणार आहेत. अंबाजोगाई नगरपरिषदेने ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमातून जागतिक पर्यावरण दिनी सर्व्हे नंबर-१७ मध्ये विविध प्रजातींच्या ४० रोपांचे वृक्षारोपण केले. लागवड केलेल्या पर्यावरणपूरक लिंब, आपटा, चिंच, पिंपळ, करंज, वड इत्यादींचा समावेश आहे. याबाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना शहर अभियान व्यवस्थापक दिलीप तांबारे यांनी सांगितले आहे की, अंबाजोगाई नगरपरिषदेने सन्माननीय मुख्याधिकारी प्रियांका टोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व सुचनेनुसार ‘एक पेड माँ के नाम’ हे अभियान सुरू केले आहे, ज्याचा उद्देश पर्यावरण संवर्धनासाठी समाजात जागरूकता पसरवणे आणि मातांबद्दल आदर व्यक्त करणे आहे. या मोहिमेअंतर्गत, आईच्या नांवाने एक झाड लावले जाते, जे पर्यावरणाचे रक्षण करते आणि चिरस्थायी स्मृती निर्माण करते. या मोहिमेचा उद्देश : पर्यावरण संवर्धन व्हावे, झाडे लावून, पर्यावरणाचे रक्षण करणे आणि निरोगी भविष्य निर्माण करणे हे या अभियानाचे खरे उद्दिष्ट आहे. आईंचा आदर : आपल्या आईच्या नांवाने झाडे लावून, मानवी जीवनाचे पालनपोषण करणाऱ्या मातांबद्दल आदर व्यक्त केला जातो. या अभियानात समुदाय सहभाग महत्त्वाचा आहे. स्थानिक समुदाय आणि विविध भागधारकांना सहभागी करून मोठ्या प्रमाणात सहभाग वाढविणे हे या मोहिमेचे खरे उद्दिष्ट आहे. हे अभियान मातांचे योगदान आणि महत्त्व अधोरेखित करते. हे अभियान देशाच्या शाश्वत विकासाच्या शोधाशी सुसंगत आहे, जी पर्यावरण आणि सामाजिक विकासामध्ये संतुलन स्थापित करते. या अभियानाअंतर्गत विविध प्रकारची झाडे लावली जातात, ज्यामुळे हिरवळ वाढते. या अभियानाद्वारे, लोकांना पर्यावरण संरक्षणाबद्दल शिक्षित केले जाते आणि झाडे लावण्यास प्रोत्साहित केले जाते. सदरील अभियानाच्या यशस्वितेसाठी मुख्याधिकारी प्रियांका टोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई नगरपरिषदेचे सर्व अधिकारी, विभागप्रमुख, कर्मचारी वर्ग, स्वच्छता विभागाचे कामगार बंधू-भगिनी आणि शहरातील विविध महिला बचत गट यांनी पुढाकार घेतला आहे. अशी माहिती शहर अभियान व्यवस्थापक दिलीप तांबारे यांनी दिली आहे.