विद्याभवन हायस्कूल कळंब येथे दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न
वैभवशाली महाराष्ट्र न्यूज

कळंब (प्रतिनिधी)
ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संचलित विद्याभवन हायस्कूल कळंब येथे दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार नुकता संपन्न झाला. ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे अध्यक्ष अनिल बापू मोहेकर, प्रशासकीय अधिकारी रमेश भाऊ मोहेकर, संस्थेचे सहसचिव भागवतराव गव्हाणे, रोहिणीताई मोहेकर, अभिजीत मोहेकर, प्रशालेचे मुख्याध्यापक व्यंकट कुंभार, उपमुख्याध्यापक विक्रम मयाचारी आदींच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. प्रमुख अतिथी म्हणून बोलताना संस्थेचे अध्यक्ष अनिल बापू मोहेकर विद्यार्थ्यांनी अभ्यासामध्ये सातत्य ठेवल्याने विद्यार्थ्यांनी देदीप्यमान यश प्राप्त केले आहे. विद्यार्थ्यांनी अंगीकारलेले जिद्द, चिकाटी, परिश्रम यामुळे निश्चितच जीवनात यश प्राप्त होईल. त्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन केले. व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. लातूर बोर्डातून व धाराशिव जिल्ह्यामधून सर्वप्रथम येण्याचा मान पटकावला त्याबद्दल आसावरी अशोक गोसावी व आडसूळ कृष्णा विलास या विद्यार्थ्यांनी शंभर पैकी शंभर टक्के गुण घेतले त्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच इतर 90 टक्क्याच्या पुढील विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. यामध्ये शेळके ओम अनिल , पांगळ मोहित संतोष , शेळके अक्षरा अनिल , इखे आशुतोष अशोक, शिंदे तेजस्विनी भारत , शेळके सई स्वप्नील, काळे सई अभय, खंडागळे तृप्ती शंकर, गिरी आर्यन बजरंग, पाटील समीरण शामसुंदर , कस्पटे हर्षदा आप्पासाहेब, जाधव तन्मय दत्तात्रेय, जाधव सिद्धी श्रीकृष्ण, जमाले प्रज्ञा बलराम, रामढवे श्रेया श्रेयश लक्ष्मीकांत, पवार आनंद उमाकांत, होळे नंदिनी आनंद, पांचाळ अर्णव अमोल, वाळके तन्वी महादेव, इंगळे श्रेया गणेश, कस्पटे अनुष्का अश्रुबा, चौधरी प्रतीक पांडुरंग, जाधव तनिष्का सचिन, मोराळे हर्षद बन्सी, तोडकर अक्षरा सतीश, पाटील सर्वेश शिवराज , साकोले यशराज दत्ता, हंडीबाग सागर चक्रधर, वाघमारे वैशाली विशाल, मोरे संकेत सुहास, जाधव सिद्धि विनायक, पवार सिद्धी सोपान , फावडे सृष्टी गणेश, जाधव यश राजेंद्र, भातलवंडे समृद्धी, मिरगणे श्रावणी साहेबराव, ठोंबरे समर्थ अमोल, माने संस्कृती मारुती, गव्हाणे संस्कृती विजय, पवार केदार दिलीप, कस्पटे अथर्व दिगंबर, सागर प्रार्थना गुरव, लांडगे अंशुमन दत्तात्रय, पाटील यशोधरा गणेशराव , शिंदे तनिष्का श्याम , बिक्कड श्वेता सुरेश, पोद्दार नंदिनी उमेश. विद्यार्थ्यांच्या
सत्कार समारंभ प्रसंगी यशस्वी विद्यार्थी व त्यांचे पालक प्रशालेतील शिक्षक वृंद सतीश कानगुडे, सोपान पवार, सुनील बारकुल, ज्योतीराम सोनके, आप्पासाहेब वाघमोडे, शरद टोम्पे , आशा राऊत, प्रशांत गुरव, श्रीकांत पांचाळ, दत्तात्रय नलावडे आदींसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद सागर यांनी केले तर आभार सुशील तीर्थकर यांनी मानले.