पिंपरखेड येथील सामाजिक कार्यकर्ते तथा उच्च न्यायालय मुंबईचे वकील माननीय प्रदीप चव्हाण यांची नवजीवन संगोपन केंद्रास सदिच्छा भेट
सामाजिक विशेष

पिंपरखेड येथील सामाजिक कार्यकर्ते तथा उच्च न्यायालय मुंबईचे वकील माननीय प्रदीप चव्हाण यांची नवजीवन संगोपन केंद्रास सदिच्छा भेट
==============================================
आष्टी प्रतिनिधी
पिंपरखेड तालुका आष्टी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा मुंबई उच्च न्यायालयाचे वकील आदरणीय प्रदीप दादा चव्हाण यांनी नवजीवन संगोपन केंद्र आष्टी येथे सदिच्छा भेट दिली.
नवजीवन संगोपन केंद्र हे कशा पद्धतीने चालते आणि या संगोपन केंद्रातील मुलांना कोणकोणत्या अडचणी आहेत आणि त्या कशा पद्धतीने सोडवता येतील याबद्दल सविस्तर चर्चा केली आणि प्रत्येक विद्यार्थ्यासोबत संवाद साधून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात स्वतः कष्ट करून कशाप्रकारे यश मिळवायचे कसा अभ्यास करावा याबद्दल सखोल असे मार्गदर्शन केले आणि हे करताना जर काही अडचणी आल्या तर कधीही माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले.
यावेळी त्यांच्या सुविद्य पत्नी आदरणीय शुभदा ताई चव्हाण यांची नुकतीच उपविभागीय पोलीस अधिकारी मुंबई पदी प्रमोशन झाल्यामुळे एडवोकेट प्रदीप चव्हाण यांनी नवजीवन संगोपन केंद्रातील सर्व मुलांना पेढे देऊन आनंद साजरा केला.
यावेळी आदरणीय प्रदीप दादा चव्हाण यांचा नवजीवन संगोपन केंद्राच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विकास म्हस्के, राहुल पवार,विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते