भविष्याचा वेध घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी सक्षम बनावे – शिवाजीराव खोगरे

अंबाजोगाई प्रतिनिधी
अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ येथील जयप्रभा माध्यमिक विद्यालयात गुरूवार, दिनांक २३ फेब्रुवारी रोजी थोर समाजसुधारक, राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांची जयंती साजरी करून इयत्ता वर्ग १० वी वर्गातील विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ घेण्यात आला.
याप्रसंगी उपस्थित सर्वच मान्यवरांनी सदिच्छा समारंभात एस.एस.सी.बोर्ड परीक्षा मार्च – २०२३ साठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून जयप्रभा ग्रामीण विकास मंडळाचे सचिव तथा सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव खोगरे व प्रमुख पाहुणे म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त अभियंता शरदराव देशपांडे हे उपस्थित होते. तर सदिच्छा समारंभाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक बन्सी पवार हे होते, उपस्थित सर्वच मान्यवरांनी मार्गदर्शन केले तसेच यावेळी रमाकांत यादव, अजय बुरगे, मल्हारी घाडगे, डॉ.बबन मस्के यांनी ही आपले समायोचित मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.रिद्धी डोईफोडे हिने केले तर उपस्थितांचे आभार चि.प्रथमेश बाबजे याने मानले. शेवटी विद्यार्थ्यांना दालबाटीची मेजवानी दिली. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन इयत्ता वर्ग ९ वी वर्गातील विद्यार्थ्यांनी केले होते.