
केज तालुका विशेष
शिंदी येथे शेतकरी महिलांचा सन्मान
आत्मा मार्फत बियाणे वाटप
माळेगाव/प्रतिनिधी:कृषि विभाग केज यांच्या वतीने तालुक्यातील विविध गावामध्ये कृषी संजीवनी सप्ताह दिनांक 25 जून ते 1जुलै दरम्यान कृषी विभागाच्या वतीने साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाचे औचित्य साधून (दि२७) मंगळावर रोजी शेतकरी महिला सन्मानदिन शिंदी येथे साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत आत्मा मार्फत मुग पीक प्रात्यक्षिक व बियाण्याचे वाटप स्थापित जिजाऊ महिला शेतकरी गटातील महिलांना करण्यात आले. या याप्रसंगी शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. कृषि पर्यवेक्षक सुभाष शेडगे यांनी बीज प्रक्रिया, घरचे बियाणे वापरणे, तसेच सन्मान होईल या पद्धतीने शेतीमध्ये तंत्र वापरून नियोजन करून पीक उत्पादनात कशी वाढ होऊ शकते याबद्दल मार्गदर्शन केले.तसेच प्रधान मंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग नावीन्य पूर्ण प्रयोग करणाऱ्या महिलांचे स्वागत करून,केलेल्या प्रयोगाची उपस्थित महिलांमध्ये विचारांची देवाणघेवाण करून त्यावर आपलं मत मांडून त्याला एक विशिष्ट वळण देऊन भविष्यात काय करता येईल यावर कृषि सहाय्यक संजय गायकवाड यांनी माहिती दिली.या कार्यक्रमास गावचे महिला सरपंच प्रियंका सुशील जाधव,कृषि पर्यवेक्षक सुभाष शेडगे,उद्यान पंडित रमेश सिरसाट,संजय गायकवाड, कृषि सहाय्यक शिंदे सी एन, बीटी एम आत्मा योगेश पाटील, किशोर फरकांडे,कृषी सहाय्यक ज्ञानेश्वर जाधव ,सुकेशिनी जाधव, सुलभा जाधव,सुंनदा जाधव व इतर महिला उपस्थित होत्या.