लोकनेते मा.आ. विनायकरावजी मेटे साहेब यांच्या षष्ठब्धी” जयंतीनिमित्तानेे आयोजित महाआरोग्य शिबिराचे उदघाटन संपन्न..
सामाजिक उपक्रम

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष
बीड जिल्हा प्रतिनिधी
लोकनेते विनायकरावजी मेटे साहेब यांच्या साठाव्या जयंतीनिमित्तानेे शिवसंग्रामची युवक आघाडी व लाईफ लाईन हॉस्पिटल बीड यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन युवक जिल्हाध्यक्ष रामहरी भैय्या मेटे यांच्या हस्ते आज संपन्न झाले.या महाआरोग्य शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये विविध आजारांचे रोगनिदान केले जाणार आहे.प्रसिद्ध तज्ञ डॉक्टर्स डॉ.संतोष शिंदे , डॉ.उज्वला शिंदे ( स्त्रिरोग तज्ञ ) , (जनरल फिजीशियन व पोट विकार तज्ञ) , डॉ.राहुल शिरपेवार (ह्रदयरोगतज्ञ) , डॉ.सागर चौधरी , (जनरल फिजीशियन), डॉ.महेश काळे, (कॅन्सर शल्यचिकित्सक),डॉ. अरुण बडे,(न्यूरो सर्जन),डॉ.उमेश धीतिडक (अस्थी विकार तज्ञ),डॉ.अजित घोडके,(किडनी तज्ञ्)डॉ.सायली उन्हाळे (दंत चिकित्सक) हे सर्व अनुभवी डॉक्टर या शिबिरामध्ये वैदयकीय सेवा देणार आहेत.
याप्रसंगी प्रभाकर आप्पा कोलंगडे, लक्ष्मण दादा ढवळे,अनिल घुमरे,यांची प्रमुख उपस्थिती होती.सुहास पाटील, पंडित माने आदी.