खोलेश्वर शैक्षणिक संकुलात ‘हैद्राबाद मुक्तिसंग्राम आणि अंबाजोगाईची शौर्यगाथा’ पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष
साहित्य विश्व
=======================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
साहित्य निर्मितीतून राष्ट्रभक्तीचा संचार मनावर व्हावा, राष्ट्रीय विचारांची घुसळण होऊन साहित्य रसिकांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना हैद्राबाद मुक्तिसंग्रामात अंबाजोगाईच्या स्वातंत्र्यसैनिकांनी गाजवलेले शौर्य ज्ञात व्हावे या हेतूने श्री.खोलेश्वर शैक्षणिक संकुल, अंबाजोगाईने तयार केलेल्या ‘हैदराबाद मुक्तिसंग्राम आणि अंबाजोगाईची शौर्यगाथा’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन केलेले आहे. हा प्रकाशन सोहळा उद्या शनिवार दि.४ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ४.३० वाजता खोलेश्वर माध्यमिक विद्यालयात संपन्न होणार आहे.
या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी लातुर येथील प्रसिद्ध इतिहास अभ्यासक प्रा.डॉ.हर्षवर्धन आर्य, इतिहास अभ्यासक गोरक्षनाथ आबुज, भा.शि.प्र.संस्थेचे कार्यवाह डॉ.श्री. हेमंत वैद्य, रा.स्व.संघ. अंबाजोगाई जिल्हा कार्यवाह बिपीन क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तरी सर्व साहित्यप्रेमींनी या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन श्री.खोलेश्वर शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष अध्यक्ष विजय वालवडकर, कार्यवाह तसेच संपादक मंडळाचे किरण कोदरकर, सौ.वर्षाताई मुंडे यांनी केले आहे. सदरील कार्यक्रमाचे आयोजन खोलेश्वर माध्यमिक विद्यालय, अंबाजोगाई येथे करण्यात आले आहे.