आपला जिल्हामहाराष्ट्र

केज तहसीलचे अव्वल कारकून(पेशकार) शेख रहेमान यांच्या सेवा निवृत्तीचा कार्यक्रम संपन्न

काम करण्याची जिद्द,चिकाटी,प्रमाणिकपणा, कशी असते ते शेख रहेमान यांच्याकडून शिका --- बीड तहसीलदार सुहास हजारे

 वैभवशाली महाराष्ट्र न्युज नेटवर्क

केज /डॉ जावेद शेख
केज कार्यालयात पुरवठा विभागात कार्यरत असणारे शेख रहेमान मियाँ हे 30 सप्टेंबर रोजी सेवा निवृत्त झाल्यामुळे तहसील कार्यालयाच्या वतीने बीड तहसीलदार सुहास हजारे , नायब तहसीलदार सचिन देशपांडे, नायब तहसिलदार धस ,नायब तहसिलदार आशा वाघ, अ.का.सय्यद, यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्यानंतर तहसीलदार सुहास हजारे यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना म्हटले की शेख रहेमान यांच्या कार्याची पद्दत व पूर्ण वेळ काम करण्याची जिद्द, चिकाटी ,इमानदारी, आजच्या आपल्या कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणा देणारे आहे.त्यांचा जीवन प्रवास खूप खडतर आहे.अशा खडतर प्रवासातून त्यानी आपली डीवटी पूर्ण वेळ पार पडली.आजच्या काळात अनके लोक शेख रहेमान सारखे चांगले काम करतात .परंतु जे काम करत नाहीत त्यांच्यासाठी सांगतो की समाजसेवा ही फक्त बाहेर जाऊन करता येत नाही तर समाजसेवा आपल्या कार्यालयातील कामकाजातुनही करता येते.कार्यालयात काम करण्याची कसब शेख रहेमान यांनी जपलेली आहे.असे काम करणाऱ्यासाठी माझा सदैव सलाम आहे.तसेच त्यांच्या कार्याची पावती वेळोवेळी शासनाने सुद्धा दिली असल्याचे तहसीलदार सुहास हजारे यांनी म्हटले आहे.
शेख रहेमान 1 फेब्रुवारी 1984 पासून दहिफळ (वड) ता केज येथे कोतवाल या पदावर नियुक्त होऊन त्यांना बढती मिळत मिळत ते अवल कारकून(पेशकार) पदावरून सेवा निवृत्त झाले आहेत आज पर्यंत त्यांच्या कार्यकाळात एक ही तक्रार आली नाही.ते जरी आज सेवा निवृत्त होत असले तरी माझे कौटुंबिक सबंध आहेत.ते मला नेहमी एक वडील म्हणून, भाऊ म्हणून,मित्र म्हणून आमच्या सोबत असणार आहे.त्यानंतर नायब तहसीलदार सचिन देशपांडे यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना शेख रहेमान हे माझ्या वडिलांसोबत काम करत होते त्यावेळेस पासून मी यांना ओळखत आहे .त्यांचा प्रामाणिकपणा, इमानदारी, कामाच्या बाबतीत निष्ठा हे सर्व मी खूप जवळून पाहिले असल्याचे सांगितले.त्यानंतर नायब तहसीलदार आशा वाघ यांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्यानी केलेल्या विविध विभागाचे काम हे स्वच्छ आणि इमानदारीनेच केले असल्याचे सांगितले.पुढील आयुष्यासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या.त्यानंतर कुटुंबातून शेख रहेमान यांचा मुलगा डॉ जावेद शेख यांनी आपले मनोगत व्यक्त करून माझ्या आई व वडिलांचा सत्कार केल्याबद्दल आभार मानले व त्यांच्या वडलाकडून कोणाचे कळत नकळत कोणाचे मन दुखावले गेले असतील तर त्याकरता डॉ जावेद शेख यांनी त्यांच्या परिवारामार्फत क्षमा मागितली.
या कार्यक्रमासाठी केज तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी, राशन दुकानदार,संजय गांधी/श्रावणबाळ कमिटीचे अध्यक्ष,सदस्य,कटुंबातील त्यांची पत्नी शेख बिस्मिल्ला, मुलगी मुलगा,पुतण्या, पुतणी, सुना ,नातू,नाती,मोठे भाऊ शेख बाबूलाल व पाहुणे, मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार महसूल पेशकार ननवरे यांनी मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.