राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बीड जिल्हा सचिवपदी गोविंद पोतंगले यांची निवड
पोतंगले यांच्या निवडीचे सर्वस्तरांतून स्वागत

वैभवशाली महाराष्ट्र न्युज नेटवर्क
अंबाजोगाई (वार्ताहर)
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बीड जिल्हा सचिवपदी गोविंद लिंबाजीराव पोतंगले यांची निवड करण्यात आली. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड.राजेश्वर चव्हाण यांच्या हस्ते बुधवारी नियुक्तीचे पत्र देण्यात आले.अंबाजोगाई तालुक्यातील मगरवाडी येथील गोविंद लिंबाजीराव पोतंगले हे यापूर्वी संभाजी ब्रिगेडचे माजी जिल्हाध्यक्ष आणि कॉंग्रेस पक्षाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष या पदावर कार्यरत होते. यापूर्वी त्यांनी संभाजी ब्रिगेड आणि भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस या राजकीय पक्षांच्या संघटनात्मक वाढीचे काम केले आहे. मराठा सेवा संघाच्या आदर्श विचारांतून पोतंगले यांचे नेतृत्व तयार झाले आहे. विविध सामाजिक आंदोलने आणि उपक्रमांतून पुढे आलेले अनुभवी, अभ्यासू तरूण नेतृत्व म्हणून बीड जिल्ह्यात सर्वदूर गोविंद पोतंगले यांना ओळखले जाते. मराठा आरक्षणाच्या चळवळीत त्यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मोलाचे योगदान दिले आहे. एक कणखर मराठा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. तसेच पोतंगले हे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांचे खंदे समर्थक म्हणून ही ते ओळखले जातात. तसेच ते राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड.राजेश्वर चव्हाण यांचे निकटवर्तीय आहेत. तसेच प्रामुख्याने परळी विधानसभा मतदारसंघात गोविंद पोतंगले यांचा दांडगा जनसंपर्क असल्यामुळे भविष्यात राज्याचे नेते माजी मंत्री आ.धनंजय भाऊ मुंडे यांना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकट करण्यासाठी त्यांचा फायदा होऊ शकतो. हे लक्षात घेऊन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ऍड.चव्हाण यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बीड जिल्हा सचिवपदी गोविंद लिंबाजीराव पोतंगले यांची निवड केली. पोतंगले यांना जिल्हाध्यक्ष ऍड.चव्हाण यांच्या हस्ते बीड येथे बुधवार, दिनांक १० ऑगस्ट रोजी नियुक्तीचे पत्र देण्यात आले. पोतंगले यांच्या निवडी बाबतीत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड.राजेश्वर चव्हाण म्हणाले की, गोविंद पोतंगले यांनी मागील काही वर्षांपासून संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून सामाजिक व राजकीय क्षेत्रांत बांधिलकी मानून काम केले आहे. त्यांना शेतकरी व सर्वसामान्य माणसांविषयी मोठी तळमळ आहे. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पोतंगले यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांच्यावर जिल्हा सचिवपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे, पक्षाच्या माध्यमातून भविष्यात त्यांना योग्य तो सन्मान व ताकद देण्यात येईल. त्यांच्या अनुभवाचा उपयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी होईल असा आम्हाला विश्वास आहे. असे जिल्हाध्यक्ष ऍड.चव्हाण यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सचिवपद मिळाल्यानंतर बोलताना नवनियुक्त बीड जिल्हा सचिव गोविंद पोतंगले यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड.राजेश्वर (आबा) चव्हाण हे पक्ष वाढीसाठी प्रचंड मेहनत घेत असून जनसामान्यांसाठी काम करणाऱ्या तरूण नेतृत्वाला पक्ष संघटनेत विविध पदे देवून पक्ष वाढवत आहेत. देशाला आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेची मोठी गरज आहे. त्यामुळे मी व माझे सहकारी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा जोपासत देशाचे नेते खासदार शरदचंद्र पवार साहेब, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार साहेब, खासदार सुप्रियाताई सुळे, राज्याचे नेते माजी मंत्री आ.धनंजय भाऊ मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड.राजेश्वर (आबा) चव्हाण, वाल्मिक आण्णा कराड, माजी नगराध्यक्ष राजकिशोर (पापा) मोदी, माजी आमदार संजयभाऊ दौंड, माजी आमदार पृथ्विराज साठे, डॉ.नरेंद्र काळे, तालुकाध्यक्ष ताराचंद शिंदे, शहराध्यक्ष अलिमभाई, माजी उपनगराध्यक्ष बबनराव लोमटे, माजी उपनगराध्यक्ष मनोज लखेरा या सर्व नेत्यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनानुसार बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अधिक बळकट करण्याचे काम प्रामाणिकपणे करू अशी ग्वाही गोविंद पोतंगले यांनी यावेळी दिली. दरम्यान गोविंद पोतंगले यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बीड जिल्हा सचिवपदी निवड होताच सर्वस्तरांतून त्यांच्या निवडीचे स्वागत होत असून राणा चव्हाण, बालाजी शेरेकर, माजी नगरसेवक अमोल लोमटे, माजी नगरसेवक महादेव आदमाने, महादेव धांडे, योगेश शिंदे, अकबर पठाण, तानाजी भोसले, मगरवाडी-दस्तगीरवाडीचे सरपंच विनायक माने, उपसरपंच शिवाजी भोसले, ग्रामपंचायत सदस्य विलास मगर, प्रमोद भोसले, दिनेश घोडके, पांडुरंग देशमुख, अमोल साठे, पांडुरंग जाधव, शेख जावेद आदींसह मित्र परिवाराने अभिनंदन केले आहे.