कळंबच्या ब्रेन मास्टर अबॅकस सेंटर ची देशात गरुड झेप
ब्रेन मास्टर प्रो ऍक्टिव्ह अबॅकस क्लास ला 'बेस्ट सेंटर अवॉर्ड

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष
धाराशिव जिल्हा विशेष
बातमी संकलन -अविनाश जगताप
31 जानेवारी 2025 रोजी कोल्हापूर येथे प्रोऍक्टिव्ह अबॅकस नॅशनल काॅम्पिटिशन संपन्न झाली. या स्पर्धेत कळंब येथील ब्रेन मास्टर प्रोऍक्टिव्ह अबॅकस सेंटरच्या विद्यार्थ्यांनी नेत्र दिपक यश मिळवले आहे. डिसेंबर 2024 च्या राज्यस्तरीय कॉम्पिटिशन मधील प्रथम, दुतीय व तृतीय क्रमांक मिळवणारे विद्यार्थी या कॉम्पिटिशन साठी पात्र होते. 6 मिनिटात 100 गणिते अचूक सोडवणे असे या कॉम्पिटिशनचे स्वरूप होते. या स्पर्धेत देशातील महाराष्ट्र, राजस्थान, कर्नाटक, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिसा, छत्तीसगड, या राज्यंसह एकुण 6300 विद्यार्थीनी सहभाग नोंदवला होता. त्यात ब्रेन मास्टर प्रोऍक्टिव्ह अबॅकस सेंटरच्या नम्रता नितीन काळे, व भक्ती मोहिते हिचा संपूर्ण भारत देशात तिसरा क्रमांक आला, इशिता सचिन हाडुळे देशात 10 वी, प्रणिती सचिन गायकवाड देशात 10 वी, श्रीश दत्तात्रेय टोणगे देशात 11 वा, अरुष रमेश गाढवे देशात 12 वा, शौर्य दत्ता नांदे देशात 15 वा क्रमांक मिळवून देशात कळंब चे नावलौकिक वाढवले आहे, बेस्ट परफॉर्मन्स ट्रॉफी विनर विद्यार्थ्यांमध्ये आयुष अमोल चव्हाण, स्वराज संजय सावंत, ओजस रमेश जाधवर, ओंकार विशाल पल्ले, राजवर्धन हनुमंत शेळके , ओंकार पांडुरंग थोरात, अथर्व राघवेंद्र ताटीपामुल, अविष्कार संदीप कुंभार, संकेत सतीश डोईफोडे, नरेंद्र दत्तात्रेय सावंत, समर्थ गणेश शिंदे, अनुज अशोक नांदे, प्रियांशू विनोद घुले, प्रियल परमेश्वर शिंदे, राघव श्याम लांडगे, राजवीर गणेश काळे, ईश्वरी दादासाहेब मोहिते, पियुशा श्याम लांडगे, श्रुती राहुल नव्हाट, आर्या अशोक गायकवाड , वेदांत राजाराम तोडकर, पवन नारायण कोळेकर हे विद्यार्थ्यां नॅशनल कॉम्पिटिशन मध्ये ट्रॉफी विनर ठरले आहेत. सर्व विजयी विद्यार्थ्यांना प्रो ऍक्टिव्ह अबॅकसचे संचालक गिरीश करडे व संचालिका सारिका करडे, तेजस्विनी सावंत यांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या विद्यार्थ्यांना ब्रेन मास्टर प्रोऍक्टिव्ह अबॅकस सेंटर च्या संचालिका प्रा .सौ. रेश्मा सावंत (शिनगारे )मॅडम प्रा.डॉ.संजय सावंत सर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच कळंब येथील ब्रेन मास्टर प्रोऍक्टिव्ह अबॅकस सेंटरला विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश, विद्यार्थ्यांची प्रगती, वर्षभरातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता, पाहून या कॉम्पिटिशन मध्ये भारत देशातून सहभागी झालेल्या 410 अबॅकस सेंटर मधून दिला जाणारा मोठा आणि मानाचा ‘बेस्ट सेंटर अवॉर्ड’ ब्रेन मास्टर प्रोऍक्टिव्ह अबॅकस कळंब ला मिळाला असून त्याबद्दल संचालिका प्रा. सौ. रेशमा सावंत (शिनगारे) यांचा प्रोऍक्टिव्ह अबॅकस चे सर्वेसर्वा गिरीश करडे सर यांनी हा अवार्ड देऊन सन्मान केला. विशेष बाब म्हणजे कळंब सारख्या ग्रामीण भागातील विदयार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवर मारलेली खुप मोठी मजल आहे सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक कळंब तालुक्यात व परिसरात होत आहे.