संभाजी ब्रिगेडच्या बीड जिल्हाध्यक्षपदी प्रा शशिकांत कन्हेरे यांची निवड
जिल्हाध्यक्ष शशिकांत कन्हेरे यांच्या निवडीने बीड जिल्ह्यात संभाजी ब्रिगेड मध्ये नवचैतन्य

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
आष्टी। प्रतिनिधी (विकास मस्के)
संभाजी ब्रिगेडच्या बीड जिल्हाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते संभाजी ब्रिगेडची मुलूख मैदानी तोफ प्रा शशिकांत कन्हेरे यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष ॲड मनोज आखरे व महासचिव सौरभ खेडेकर यांच्या आदेशानुसार निवड करण्यात आली आहे. सामाजिक कार्यात सतत अग्रेसर राहणा-या प्रा कन्हेरे यांची थेट बीड जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने बीड जिल्हयात आनंद व्यक्त केला जात आहे.
मराठवाडासह बीड जिल्ह्यात संभाजी ब्रिगेडचा विचार सर्वदूर पोहोचविला.प्रा शशिकांत कन्हेरे यांनी सामाजिक बांधिलकी मानून केलेले कार्य तसेच ते अनेक वर्षांपासून पुरोगामी चळवळीत सक्रिय आहेत. त्यांची सामाजिक व राजकीय वाटचाल या सर्व कार्याची दखल घेऊन संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अॅड.मनोज आखरे यांनी प्रा शशिकांत कन्हेरे यांची बीड जिल्हाध्यक्षपदी निवड करून त्यांना शुभेच्छा दिल्या.दरम्यान आपल्या निवडीविषयी आभार मानून बोलताना प्रा शशिकांत कन्हेरे यांनी सांगितले की,संभाजी ब्रिगेडचे संघटन वाढीवर भर देणार आहोत. समाजातील प्रश्न सोडविणार आहोत.तसेच सामान्य माणसांवर होणा-या अन्याय-अत्याचारा विरूद्ध लढण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून 24 तास जनसेवेसाठी उपलब्ध असेन असे नवनिर्वाचित बीड जिल्हाध्यक्ष प्रा शशिकांत कन्हेरे यांनी सांगितले.त्यांच्या या निवडीबद्दल प्रदेश संघटक डॉ सुदर्शन तारक,विभागिय अध्यक्ष ॲड राहुल वायकर,मराठा सेवा संघाचे आष्टी तालुकाध्यक्ष इंजिनिअर तान्हाजी जंजीरे याच्यासह मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे.