ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
बीड जिल्हा प्रतिनिधी
येथील ऋषिकेश आण्णासाहेब लोमटे यांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या बीड जिल्हा (केज – धारूर – अंबाजोगाई – परळी) कक्ष प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. याबाबत त्यांना राज्य कक्ष प्रमुख रामहरी राऊत यांनी निवडीचे पत्र दिले आहे.
निवड पत्रात नमूद करण्यात आले आहे की, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, खासदार डॉ.श्रीकांतजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेनुसार वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या बीड जिल्हा – (केज – धारूर – अंबाजोगाई – परळी) कक्ष प्रमुख या पदासाठी आपली ६ महिन्यांकरिता निवड करण्यात येत आहे. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून आपण गोर-गरीब, गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकांतील रूग्णांना धर्मादाय रूग्णालयात (१० टक्के) राखीव खाटा उपलब्ध करून देणे, निकषांत बसत असलेल्या गरीब रूग्णांवर पुर्णतः मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यासंदर्भातील मदत तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत नोंदणी असलेल्या रूग्णालयांमध्ये गरजू रूग्णांना शस्त्रक्रिया मोफत करणे संदर्भात योग्य मार्गदर्शनासाठी सदैव तत्पर रहावे. गंभीर-महागड्या शस्त्रक्रिया करावयाच्या असलेल्या गोरगरीब गरजू रूग्णांना भरीव प्रमाणात अर्थसहाय्य व्हावे याकरीता पंतप्रधान वैद्यकीय सहाय्यता निधी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, श्री.सिध्दिविनायक ट्रस्ट, टाटा ट्रस्ट यांसारख्या विविध ट्रस्टच्या माध्यमातून मदत मिळवून देण्यासाठी थेट शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष मुख्य कार्यालयास संपर्क साधावा. असे महाराष्ट्र राज्याचे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षप्रमुख रामहरी भिमराव राऊत यांनी निवडपत्र देताना नमूद केले आहे. ऋषिकेश लोमटे हे शिवसेना (शिंदे गट) अंबाजोगाईचे पहिले शहरप्रमुख आहेत. ते व्यावसायाने इंजिनियर आहेत. कुशल संघटक, उत्तम वक्ते आहेत. समाजसेवेचा वारसा त्यांना लोमटे (नवाब) कुटुंबातूनच मिळाला आहे. शिवसेना शहरप्रमुख झाल्यापासून त्यांनी अंबाजोगाई शहरात प्रशांत नगर भागात प्रशस्त शिवसेना शहर मध्यवर्ती कार्यालय सुरू केले. आपल्या विधायक, लोकोपयोगी कार्यातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यापर्यंत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. शिवसेनेतील सर्व ज्येष्ठ नेते, प्रमुख आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सोबत घेऊन, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये सहभागी होत पक्ष संघटनेला बळकटी देण्याचे काम ते सातत्याने करीत आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस विविध उपक्रमांचे आयोजन करून राबविला. पक्ष संघटनेच्या बैठकीत, अधिवेशन, वर्धापन दिनी विविध मुद्द्यांवर चर्चा घडवून आणली. समाजातील गरजू लोकांना वैद्यकीय सहाय्यता मदत मिळवून दिली. भव्य मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करून जनरल, ह्रदयरोग, नेत्र, ऍंजीओग्राफी, हाडांचे विकार, बालरोग, मुतखडा यांची तपासणी केली. तसेच मोफत औषधे वाटप केली. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व रामहरी राऊत सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कृत्रिम हात व पाय (जयपुर फूट) यांचे मोफत वाटप शिबीर आयोजित केले. या शिबिराचा लाभ ५०० हून अधिक नागरिकांनी घेतला. असे भव्य आणि नियोजनबद्ध शिबिर मराठवाड्यात प्रथमच आयोजित करण्यात आले होते. असे निमंत्रित मान्यवरांनी स्वतः सांगितले. खेळाडूंसाठी स्पर्धा घेतल्या. शिवजन्मोत्सवासह विनंती महापुरूषांचे जयंती सोहळ्यात सहभागी झाले. शासन आपल्या दारी, लाडकी बहिण योजना मोफत नांव नोंदणी शिबिराचे आयोजन करून प्रभावीपणे राबविली. प्रशिक्षणार्थी डॉक्टर, आशा वर्कर, सफाई कामगार, ऍटो चालक युनियन, सुशिक्षित बेरोजगार, छोटे व्यावसायिक यांच्या प्रश्नांची सोडवणूक केली. याच सर्व विधायक आणि सातत्यपूर्ण कार्याची दखल घेऊन राज्य कक्षप्रमुख रामहरी राऊत यांनी ऋषिकेश आण्णासाहेब लोमटे यांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या बीड जिल्हा (केज – धारूर – अंबाजोगाई – परळी) कक्षप्रमुखपदी निवड केली आहे. आपल्या निवडीबद्दल ऋषिकेश लोमटे यांनी मंगेशजी चिवटे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष प्रमुख तथा विशेष कार्य अधिकारी मुख्यमंत्री, राज्य कक्षप्रमुख रामहरीजी राऊत, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिनजी मुळूक (बीड) यांचे आभार मानले आहेत. आगामी काळात शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन मुडेगावकर (बीड) व तालुकाप्रमुख अर्जुन वाघमारे यांचे सहकार्य व सोबतीने शिवसेना पक्ष संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून बीड जिल्ह्यातील केज – धारूर – अंबाजोगाई – परळी या तालुक्यातील जनतेला अहोरात्र मेहनत घेऊन वैद्यकीय सहाय्यता मिळवून देणार असल्याचे लोमटे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ऋषिकेश लोमटे यांच्या निवडीचे सर्वस्तरांतून अभिनंदन व स्वागत होत आहे.