सहकार विशेष

अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याला गतवैभव मिळवून देण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील – चेअरमन रमेशराव आडसकर

अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज

बीड जिल्हा प्रतिनिधी

अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना लि.अबांसाखरची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याच्या प्रांगणात सोमवार, दिनांक ३० सप्टेंबर २०२४ रोजी संपन्न झाली. यावेळी बोलताना चेअरमन रमेशराव आडसकर यांनी अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याला गतवैभव मिळवून देण्यासाठी संचालक मंडळाने पुढाकार घेतला आहे. हा कारखाना चांगल्या पद्धतीने चालविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

प्रारंभी अहवाल वर्षातील दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर अहवालाचे वाचन करण्यात आले, त्यास उपस्थित सभासदांनी टाळ्यांच्या गजरात मंजुरी दिली. यावेळी सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष म्हणून बोलताना चेअरमन रमेशराव आडसकर म्हणाले की, आपल्या कारखान्याच्या ४७ व्या वार्षीक सर्वसाधारण सभेस सर्वजण उपस्थित राहिलात या बद्दल संचालक मंडळाचे वतीने मी सर्वांचे हार्दीक स्वागत करून दिनांक १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षाचा कारखान्याच्या कामकाजाचा वार्षिक अहवाल व ताळेबंद पत्रक नफा-तोटा पत्रक तसेच सन २०२३-२०२४ वर्षाचा अर्थसंकल्प इत्यादी आपल्यासमोर सादर करीत आहे. अहवाल काळात कारखाना बंद होता व तो भाडे तत्वावर मे.व्यंकटेश इंडस्ट्रीज लि.परळी- वैजनाथ यांना चालविण्यास दिला होता. परंतु, त्यांनी सदर कारखाना भाडे तत्वावर चालविण्यास आमची कंपनी असमर्थ आहे. असे लेखी कळविले आहे. यामुळे सध्याच्या विद्यमान संचालक मंडळाने राज्य शासन, केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून हा कारखाना चालु करणे करीता मार्जीन मनी खेळते भांडवल ८० कोटी रूपये मंजुर करून घेणे बाबत परिश्रम घेतले व शासन निर्णयाप्रमाणे आपल्या कारखान्यास मंजुर करण्यात आले. याबाबत कारखाना राज्य शासन केंद्र शासन यांचा अत्यंत आभारी आहे. आपल्या कारखान्यास आर्थिक मदत करण्याकरिता महाराष्ट्राचे सन्माननिय मुख्यमंत्री एकनाथराजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कृषिमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे, राष्ट्रीय सहकारी संघ, नवी दिल्ली यांचे चेअरमन हर्षवर्धनजी पाटील व आमदार पंकजाताई मुंडे यांचे मी सर्व संचालक मंडळाच्या वतीने जाहीर आभार मानतो. या सर्व मान्यवर नेत्यांनी आपणांस मोलाचे सहकार्य केले आहे. याबद्दल वरील सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानतो. तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य, मार्गदर्शन करणारे राज्याच्या मंत्रीमंडळातील सर्व सन्माननिय सदस्य, राज्याचे सहकार सचिव, खासदार, आमदार, साखर आयुक्त, प्रादेशिक सहसंचालक (साखर), साखर संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकारी संचालक, सरव्यवस्थापक तसेच बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, जिल्हा निबंधक, सहाय्यक निबंधक, जिल्हा पोलीस प्रमुख, तहसिलदार, सर्व शासकीय कार्यालयाचे अधिकारी व बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापक, नगरपरिषद अंबाजोगाईचे मुख्याधिकारी व अधिकारी, शासकीय लेखापरिक्षक, अंतर्गत लेखापरिक्षक यांचे ही संचालक मंडळाच्या वतीने आभार मानतो. आजच्या वार्षीक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने मी आपल्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना विनंती करतो की, हंगाम २०२४-२५ करीता ऊसाची मोठ्या प्रमाणावर लागवड करावी. कारण, या वर्षी पर्जन्यमान चांगले असून, मांजरा धरण शंभर टक्के क्षमतेने भरले आहे. मोठ्या प्रमाणावर ऊसाची लागवड करून आपल्या कारखान्यास ऊस गाळपाकरीता पुरविण्यात यावा अशी विनंती व आवाहन चेअरमन रमेशराव आडसकर यांनी केले. तसेच ४७ वा वार्षीक अहवाल आपल्या समोर सादर केलेला असून, कारखान्याचे सर्व संबंधीत सभासद, संचालक मंडळ सदस्य, अधिकारी, कर्मचारी, तोडणी वाहतुक कामगार, व्यापारी वर्ग, पत्रकार बांधव मित्र, हितचिंतक यांनी जे आपले अनमोल सहकार्य केले. या बद्दल ही पुनःश्च सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. असे चेअरमन आडसकर यांनी सांगितले. प्रारंभी व्हाईस चेअरमन दत्तात्रय पाटील यांनी अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना सचोटीने, चांगल्या पद्धतीने चालविण्यासाठी संचालक मंडळ तयार आहे, मांजरा धरण भरल्याने पुढील दोन-तीन वर्षे ऊस कमी पडणार नाही. कारखान्याला गतवैभव मिळवून देवूत, गरजेप्रमाणे मनुष्यबळ वापरले जाईल. अर्थसहाय्य उपलब्ध करून दिल्याबद्दल कृषिमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे यांना व्हाईस चेअरमन पाटील यांनी धन्यवाद दिले. सभेच्या सुरूवातीला कार्यकारी संचालक डि.एन‌.मरकड यांनी नोटिस वाचन केले. विषयपत्रिकेवरील विषयांवर मांडणी करून उपस्थित सभासदांनी टाळ्यांच्या गजरात मान्यता द्यावी असे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला उपस्थित सभासदांनी टाळ्यांच्या गजरात मान्यता दिली. या सर्वसाधारण सभेच्या वेळी अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक ऍड.प्रमोद जाधव, ऋषिकेश आडसकर, संभाजी इंगळे, लक्ष्मीकांत लाड, अशोक गायकवाड, गोविंद देशमुख, राजाभाऊ औताडे, विजय शिनगारे, बाळासाहेब सोळंके, मधुकर शेरेकर, अनिल किर्दंत, जिवन कदम, लालासाहेब जगताप, अनंत कातळे, विठ्ठल देशमुख, शशिकांत लोमटे, मिनाज युसुफखाॅं पठाण, रमाकांत पिंगळे, श्रीमती भागिरथी साखरे, श्रीमती वच्छलाबाई शिंदे, एस.बी.साखरे, कार्यकारी संचालक दत्तात्रय मरकड यांच्यासह केज कृ.उ.बा.समितीचे सभापती अंकुशराव इंगळे, अंबाजोगाई कृ.उ.बा.समितीचे माजी सभापती विलासराव सोनवणे, धारूर कृ.उ.बा.समितीचे उपसभापती सुनील शिनगारे, लातूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य साहेबराव पवार, उध्दवराव इंगोले, अजय (चिमू) पाटील, शिवाजीराव मायकर, रमेश नखाते, धारूर पंचायत समितीचे माजी सभापती विलास खुळे, ऍड.बालासाहेब इंगळे, रामकिसन खोडसे, अजित गरड, रणजित लोमटे, शिंदे मामा, बाळासाहेब देशमुख, अनिल माचवे यांच्यासह सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते आणि बहुसंख्येने सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्याचे खातेप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सरपंच रविकिरण देशमुख यांनी केले. तर उपस्थितांचे आभार संचालक राजेभाऊ औताडे यांनी मानले. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याची ४७ वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.