दीनदयाळ बँकचे अध्यक्ष ऍड.मकरंद पत्की यांच्या वाढदिवसानिमित्त आशादत्त गोशाळेत चारा वाटप

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
मराठवाड्याच्या बॅंकिंग क्षेत्रात सातत्यपूर्ण उल्लेखनीय कामगिरी करीत नांवारूपास आलेल्या दीनदयाळ नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष ऍड.मकरंद पत्की यांच्या वाढदिवसानिमित्त आशादत्त गोशाळेत चारा वाटप करण्यात आला.
ऍड.मकरंदजी पत्की व त्यांच्या सहकाऱ्यांनी अंबाजोगाई येथील आशादत्त गोशाळेतील गुरांना चारा वाटप करून गोमाता रक्षण व संगोपन करण्याचा आपल्या वाढदिवसानिमित्त विधायक संदेश दिला. मितभाषी, अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून सर्वदूर ओळखले जाणारे ऍड.पत्की हे विधी, सहकार, समाजसेवा आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत. यावेळी दीनदयाळ बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी सनतकुमार बनवसकर तसेच बँकेचे कर्मचारी स्वप्निल सिद्धांत्ती, वल्लभ उमनवार, अजय पांडे, इंद्रजीत आघाव, अभिमन्यू वैष्णव आदींसह मित्र परिवार उपस्थित होता. अतिशय चांगल्या संकल्पनेतून गाईंना चारा देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला. या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले.