श्री संत ज्ञानेश्वर गुरुकुल येथे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
केज/ प्रतिनिधी
श्री संत ज्ञानेश्वर गुरुकुल येथे मोठ्या उत्साहात स्नेहसंमेलन झाले संपन्न झाले.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य तथा ह.भ.प.ईश्वरजी मुंडे सर, या कार्यक्रमाचे उद्घाटक सुरेश तात्या पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते प्रा.हनुमंत भोसले सर, कानडी माळी चे सरपंच अशोक राऊत, साबल्याच्या सरपंच जनाबाई काकडे,सरपंच विष्णू थोरात, माजी सरपंच दिनकर चाटे, होळचे ग्रामपंचायत सदस्य हनुमंत घुगे, माजी. सभापती नारायण बप्पा घुले,गोकुळ सारूक, सुदाम पालकर सर, माजी चेअरमन श्रीकांत घुले, अशोक चाळक, ज्येष्ठ पत्रकार धनंजय कुलकर्णी, अशोक नागरगोजे, वसंत सोनवणे, तात्या गवळी, मुबाशीर खतीब यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रसह विविध क्षेत्रातील मान्यवर व पत्रकार बांधव बांधव तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना ईश्वरजी मुंडे यांनी गुरुकुल याविषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले. पुढे बोलताना मुंडे म्हणाले की, श्रीराम प्रभू,लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांनाही गुरुकुल मध्ये शिक्षण घेण्यासाठी त्याकाळी पाठवले होते तसेच आताच्या आधुनिक काळात गुरुकुल विषयी शाळेतून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांना व्यसनापासून मुक्त व्हावे व व्यसनाच्या आहारी जाऊ नये याचे शिक्षण दिले पाहिजे व मोबाईलचा अतिवापर टाळला पाहिजे शाळेची शिक्षकाची व पालकाचे जबाबदारी आहे असे मत प्राचार्य ईश्वर मुंडे सर व्यक्त केले आहे. यावेळी विद्यार्थी व उपस्थित पालकांना भोसले सर यांनी मोलाचा सल्ला दिला आहे. यावेळी साबल्याच्या सरपंच जनाबाई काकडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या. तर सुरेश तात्या पाटील यांनीही श्री संत ज्ञानेश्वर गुरुकुलचे संस्थापक सचिव दादासाहेब कराड यांना या संस्थेचे रूपांतर वटवृक्षात व्हावे अशा शुभेच्छा दिल्या व सदैव आम्ही आपल्या सोबत आहोत अशा शुभेच्छा देऊन लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी थोडक्यात मनोगत व्यक्त करून मान्यवरांनी छोट्या चिमुकल्या मुलांचे कौतुक पाहण्यासाठी मान्यवरांनी बक्षीस रूपात त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले.
यावेळी संत ज्ञानेश्वर गुरुकुल संस्थेचे सर्व कर्मचारी वृंद विद्यार्थी पालक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.