कृषी विशेषदेश विदेशसहकार विशेष

ॲग्रो इनपुट्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया (एम) च्या निवडणुकीत राजकुमार धुुरगुडे यांचे पॅनल विजयी

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज

पुणे जिल्हा प्रतिनिधी / इंजि. डी.एच . शिनगारे

भारतीय कृषी निविष्ठा उत्पादक संघ अर्थात ‘ॲग्रो इनपुट्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ (एम) ही भारतातील कृषी निविष्ठा ( खते,औषधे ) उत्पादन क्षेत्रातील उत्पादकांची एक अग्रगण्य संस्था आहे. या असोसिएशन ची १४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक २६ सप्टेंबर २०२४ रोजी पुणे येथील हॉटेल शेरेटन ग्रँड या ठिकाणी संपन्न झाली. या सभेला भारतातील विविध राज्यांमधून २०० हून अधिक ‘एम’ असोसिएशनचे सभासद उपस्थित होते.

या वार्षिक सर्वसाधारण सभेत असोसिएशनच्या गव्हर्निंग कौन्सिल अर्थात संचालक मंडळाची निवड करण्यात आली. यामध्ये संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. राजकुमार धुरगुडे पाटील यांच्यासह उपाध्यक्ष मा. श्री. प्रदीप कोठावदे, सचिव मा. श्री. समीर पाथरे, सहसचिव मा. श्री. वैभव काशीकर यांच्यासह अकरा सभासदांची संचालक मंडळावर बिनविरोध निवड झाली.

असोसिएशनचे निवडणूक अधिकारी मा. श्री शिवाजी थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये अंतिम छाननीनंतर अकरा अर्ज वैध ठरले ज्यात मागील संचालक मंडळांमधील १० तर एका नव्या सदस्याची निवड करण्यात आली. निवडून आलेले अकरा सदस्य पुढील प्रमाणे. राजकुमार धुरगुडे पाटील, प्रदीप कोठावदे, समीर पाथरे, वैभव काशीकर, सर्जेराव शिसोदे, रविंद्र अग्रवाल, राजीव चौधरी, प्रकाश औताडे, प्रशांत शिंदे, अनिल हवल आणि कमलजीत सिंग

कृषी निविष्ठा उत्पादन क्षेत्रातील बायोस्टिम्युलंट उत्पादनांना केंद्र सरकारने खत नियंत्रण आदेश (FCO) कायद्यामध्ये समाविष्ट केले आहे. या प्रक्रियेमध्ये ॲग्रो इनपुट्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (एम) ने महत्त्वाची भूमिका बजावत केंद्र सरकारकडे सकारात्मक रित्या पाठपुरावा केला आहे. बायोस्टिम्युलंट उत्पादनांना नोंदणीकृत करण्यासाठी लागणारे विविध ट्रायल डेटा एम ने तयार करून केंद्र सरकारकडे सादर केला आहे.

असोसिएशनचे सहसचिव मा. श्री वैभव काशीकर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात सभेला संबोधित करताना असोसिएशनच्या माध्यमातून विविध कमिटी स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती सर्वांना दिली.

असोसिएशनचे पदाधिकारी मा. श्री अनिल हवल यांनी आपल्या भाषणात असोसिएशनने केलेल्या कामाची माहिती दिली.

या सभेमध्ये संस्थेचे सचिव मा. श्री समीर पाथरे यांनी सभासदांना सखोल मार्गदर्शन केले. सुरुवातीला त्यांनी संस्थेच्या मागील वर्षातील कार्याचा आढावा घेतला. नुकतेच केंद्रीय कृषी मंत्रालयाने काढलेल्या उत्पादनाच्या जीआर संदर्भात त्यांनी सभासदांना अवगत केले. याचबरोबर येणाऱ्या वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाबद्दल त्यांनी सभासदांना माहिती दिली. एम असोसिएशनच्या सभासदांच्या उत्पादनांची तपासणी करण्यासाठी असोसिएशनच्या माध्यमातून प्रयोग शाळेची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळेस सांगितले. बायोस्टिम्युलंट नोंदणीसाठी लागणाऱ्या फॉर्म जी मिळवण्यासाठीच्या तांत्रिक बाबींबद्दल त्यांनी सभासदांना सखोल मार्गदर्शन केले.

असोसिएशनचे उपाध्यक्ष मा. श्री प्रदीप कोठावदे यांनी आपल्या भाषणात सर्वांना असोसिएशनचे महत्त्व पटवून देऊन, भविष्यात होणाऱ्या फायद्याविषयी सभासदांना माहिती दिली.

या सभेत बोलताना संस्थेचे अध्यक्ष मा. श्री राजकुमार धुरगुडे पाटील यांनी सभासदांना एम असोसिएशनने केलेल्या कार्याचे महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले “आज ‘एम’ ने तयार केलेला डेटा केंद्र सरकारने मान्य केला असून त्या आधारेच आठ बायोस्टिम्युलंट उत्पादनांना एफ सी ओ मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. याचा फायदा देशातील सर्व कृषी निविष्ठा उत्पादकांना होणार असून ‘एम’ असोसिएशनने यासाठी केलेले कष्ट हे देशातील सर्व शेतकऱ्यांना देखील उपयुक्त ठरणार आहेत. आमच्या असोसिएशनने देशातील शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून सदर उत्पादनांचा डेटा सर्वांसाठी लागू करण्यासाठी सहमती दर्शवली. आपल्या असोसिएशनने फक्त स्वतःच्या फायद्यासाठीची संकुचित भूमिका न घेता व्यापक हित लक्षात ठेवत घेतलेल्या निर्णयाचा कृषी क्षेत्राला भविष्यात नक्कीच खूप मोठा फायदा होणार आहे.” याबरोबरच त्यांनी संचालक मंडळाला पुन्हा निवडून दिल्याबद्दल सर्व सभासदांचे आभार व्यक्त केले.

या सभेत असोसिएशनचे ट्रेझरर मा. श्री सर्जेराव शिसोदे यांनी वार्षिक ताळेबंद सादर केला, तसेच असोसिएशनचे कार्यकारी सदस्य मा. श्री प्रकाश औताडे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.