भारतीय भटक्या विमुक्त जमाती विकास संघटना बीड जिल्हा अध्यक्षपदी हनुमंत धनवटे
तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब सानप यांची निवड

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
आष्टी तालुका प्रतिनिधी /विकास मस्के
दिनांक 27/ 09/2024रोजी शासकीय विश्राम गृह बीड येथे भारतीय भटक्या विमुक्त जमाती विकास संघटनेची बैठक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक सुधीर अनवले सर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीमध्ये भटक्यांच्या विविध प्रश्नावर चर्चा झाली. नंतर बैठकीमध्ये जिल्हाध्यक्ष पदासाठी दगडू दादा गायकवाड प्रदेश उपाध्यक्ष भारतीय भटक्या विमुक्त जमाती विकास संघटना यांनी हनुमंत धनवटे यांचे नाव बीड जिल्हाध्यक्षपदासाठी सुचवले,या नावाला डॉक्टर केशवदास वैष्णव मराठवाडा उपाध्यक्ष यांनी अनुमोदन दिले. या बैठकीस भारतीय भटक्या व मुक्त जमाती विकास संघटनेचे असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. हनुमंत धनवटे यांची भारतीय भटक्या विमुक्त जमाती विकास संघटना जिल्हा बीडच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भटक्या विमुक्तांचे समाज भूषण माननीय शंकर विटकर व माननीय देवीदास गायकवाड यांनी हनुमंत धनवटे यांचा सत्कार केला.
आष्टी तालुका अध्यक्ष अविनाश विटकर व बीड जिल्हा उपाध्यक्ष विकास मस्के मेजर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.