श्रीगणेश जयंतीनिमित्त पालखी सोहळा उत्साहात साजरा
श्री गणपती मंदिर ट्रस्ट, चौभारा यांच्याकडून विविध उपक्रम

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
शहरातील श्री गणपती मंदिर ट्रस्ट, चौभारा यांच्याकडून दरवर्षी प्रमाणेच याही वर्षी श्रीगणेश जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. यात गणेशयाग, पालखी सोहळा काढण्यात आला. सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
श्री गणपती मंदिर ट्रस्ट, चौभारा यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणेच याही वर्षी श्रीगणेश जयंतीनिमित्त शनिवार, दिनांक १ फेब्रुवारी २०२५ रोजी विविध उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमात गणेश भक्त, महिला, युवक, युवती, ज्येष्ठ नागरिक आणि बाल गोपाळ आकर्षक वेशभूषा करून मोठ्या उत्साहात सहभागी झाले. यावेळी श्रीगणेशयाग पालखी सोहळ्यात युवकांनी भगव्या पताका खांद्यावर घेऊन, लेझीम तर महिलांनी झांज, टाळ वाजवून फुगडीवर ठेका धरत गणेश गीतांतून नामघोष केला. सदर पालखी भगवान महावीर चौक, कोठाड गल्ली, काळा हनुमान मंदिर खडकपुरा, देवघर, सेनापती बाजी प्रभू देशपांडे चौक, सुभेदार तानाजी मालुसरे चौक, मध्यवर्ती हनुमान मंदिर, काळम पाटील गल्ली, खोलेश्वर मंदिर येथून निघून गणपती मंदिर चौभारा येथे समारोप झाला. त्यानंतर सर्व भाविक भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आले. विविध कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिरीष भावठाणकर, विजयराव उमणवार, शंकरराव भावठाणकर, सतिश राऊत, भागवतराव देवशटवार, नंदकिशोर देशमाने, भिमाशंकर राऊत, प्रभाकर देशमाने, दयानंद दगडू राऊत, माऊली सातभाई, शंभुलिंग राऊत, संगम देवशटवार, दयानंद राऊत, बालाजी कोंडेकर, अमोल राऊत, राम घोडके, अतुल राऊत, सुहास सातभाई, शिवलिंग राऊत, शंकर सातभाई, नागेश्वर राऊत, संकेत झरकर, ओमकार धोत्रे, राहुल भावठाणकर, संदीप भावठाणकर, शुभम भावठाणकर, महेश राऊत, बालाजी राऊत, गोविंद राऊत, विलास जिरे, कृष्णा घोडके, संतोष घोडके, गजानन घोडके, अनंत घोडके, अभिजीत राऊत, अनिकेत राऊत, नितीन जिरे, योगेश कातळे, रमेश देशमाने, चंद्रकांत देशमाने, उमाकांत देशमाने, संदीप देशमाने, प्रसाद देशमाने, बाळकृष्ण देशमाने, विमलनाथ कोंडेकर, वैजनाथ जाधव, गणेश जाधव, विष्णू जाधव, पप्पू सातभाई, गजानन भावठाणकर, विशाल कंठीकर आदींसह गणेश भक्त, ट्रस्टचे पदाधिकारी यांनी पुढाकार घेतला होता.