अंबाजोगाईत ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले जयंतीनिमित्त ३ जानेवारी रोजी विविध उपक्रमांचे आयोजन
_अभिवादन रॅली, आदर्श माता पुरस्कार, गुणवंतांचा गुणगौरव आणि प्रबोधनपर व्याख्यान_

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी येथील महात्मा फुले सेवा संघ, अंबाजोगाई यांच्या वतीने अंबाजोगाईत ३ जानेवारी २०२५ रोजी ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या निमित्त आयोजित बैठकीत अभिवादन, अभिवादन रॅली, आदर्श माता पुरस्कार, गुणवंतांचा गुणगौरव आणि प्रबोधनपर व्याख्यान आदी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात करण्यासंदर्भात सर्वानुमते ठरले.
जयंती उत्सव आयोजनासाठी नितीन रामराव जिरे यांच्या निवासस्थानी आयोजित बैठकीत अंबाजोगाईत ३ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ८ वाजता कै.गोदावरीबाई कुंकूलोळ योगेश्वरी कन्या शाळेत ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्यास अभिवादन करून जयंती उत्सव सोहळ्यास प्रारंभ करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ८.३० वाजता अभिवादन बाईक रॅली काढण्यात येईल. ही रॅली साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चौक, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, रणवीर तानाजी मालुसरे चौक, पाटील चौक, गुरूवार पेठ सिमेंट रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे निघून ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले चौक येथे रॅलीचा समारोप होईल. या सर्व चौकातील नामफलकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येईल. त्यानंतर सायंकाळी ६. ३० वाजता महात्मा फुले सेवा संघ, अंबाजोगाई यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले आदर्श माता’ पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजातील आदर्श शिक्षक भागवतराव मसने, चि.प्रसाद भागवतराव मसने, कृष्णा शिवाजीराव जिरे, कु.ईश्वरी रामेश्वर खाडे या गुणवंतांचा गुणगौरव करण्यात येईल. त्यानंतर प्रा.डॉ.योगेश सुरवसे यांचे ‘आपल्यासाठी सावित्रीमाई’ या विषयावर प्रबोधनपर व्याख्यान होईल. हे सर्व कार्यक्रम स्वयंवर मंगल कार्यालय, संत सावता माळीनगर या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहेत. ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले जयंती उत्सवाच्या यशस्वितेसाठी आयोजक प्रकाश बलुतकर, विष्णु राऊत, अंकुश घोडके, संतोष राऊत, बालासाहेब मसने, नितीन जिरे, शरद माळी, राम घोडके, मंगेश बलुतकर, पंकज राऊत, नंदकुमार बलुतकर, अभिजीत जिरे, पवन जिरे, पवन घोडके, कृष्णा मसने, अनिकेत घोडके, आकाश चोपने, श्रीनिवास मसने, नवनाथ माळी, बालासाहेब माळी, अमोल जिरे, निवृत्ती जिरे, सिद्राम पाथरकर, विशाल पाथरकर, सिद्राम घोडके, प्रविण चोपने, दिनेश घोडके, अशोक बलुतकर, ऋषि पाथरकर आदींसह महात्मा फुले सेवा संघ, अंबाजोगाई यांच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे.