बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किसान सभेची तीव्र निदर्शने!
कंपनीसरकार च्या पुतळ्याचे केले दहन!

बीड जिल्हा प्रतिनिधी/ कृषी विशेष
बीड जिल्ह्यात गेल्या ११ऑक्टोबर पासून चालू असलेल्या परतीचा पाऊस अतिवृष्टीने काढणीला आलेल्या सोयाबीन ची माती आणि कापसाच्या वाती केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास परतीच्या पावसाने हिसकावला असल्याने शेतकरी हताश झाला आहे. निराशेने गळ्याला फास लावून घेत आहे. अशा अनेक दुर्दैवी घटना गेल्या ८ दिवसात समोर आल्या आहेत. अशा भयाण परिस्तिथी मध्ये सुद्धा शासन ई पीक पाहणी, प्रशासन पंचनाम्याचे घोडे नाचवतंय तर विमा कंपनी ची तक्रार होत नाहीये.
या प्रश्नांना घेऊन पंचनाम्याचे घोडे नाचवू नका,NDRF च्या निकषप्रमाणे सरासकट अनुदान,१००%विमा दिवाळीपूर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा.या प्रमुख मागण्यासह
१. पंचनामे न करता सरसकट NDRF प्रमाणे शेतकऱ्यांना अनुदान देऊन त्यांची दिवाळी गोड करा.
२. पीक विमा तक्रार ज्यांची ऑनलाइन होत नाही त्यांची ऑफलाईन तक्रार कृषी कार्यालयात घ्यायला लावा.
३. बाकी राहिलेल्या महसूल मंडळांना मंजूर विमा अग्रीम वाटप करा.
४. सदोष पर्जन्यमापक यंत्रणेचे पावसाचे आकडे मागे घ्या व ओला दुष्काळ जाहीर करा.
५. प्रत्येक शेतकऱ्याचा पीकविमा सर्वे न करता सॅम्पल सर्वे करून तात्काळ ३० दिवसात १०० % विमा अदा करा.
या मागण्यांना घेऊन बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कंपनी व सरकारच्या नावांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून कंपनीसरकाच्या विरोधात घोषणाबाजी करून तीव्र निदर्शने करण्यात आली.यावेळी किसान सभेचे कॉ. जगदीश फरताडे यांनी शेकऱ्यांशी बोलताना “फक्त विमा अनुदानच नाही तर, येणाऱ्या काळात ऊसप्रश्नावर सुद्धा प्रचंड मोठा लढा उभरावा लागेल. किसान सभा तो नक्कीच उभारून विविध प्रश्न मार्गी लावणार आहे.” असे म्हणाले. शिष्टमंडळाच्या चर्चेनंतर कॉ.अजय बुरांडे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
या निदर्शनाला शेतकरी संघटनेकडून पुजा ताई मोरे यांनी संबोधित करताना शेतकऱ्यांची सध्याची झालेली परिस्तिथी मांडली.त्याचबरोबर युवक संघटनेचे विशाल देशमुख व मोहन जाधव यांनी पाठिंबा दिला.
यावेळी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करण्यासाठी किसान सभेच शिस्टमंडळ गेले. यामध्ये किसान सभा जिल्हाध्यक्ष कॉ.ऍड.अजय बुरांडे, जिल्हासचिव कॉ. मुरलीधर नागरगोजे, कार्याध्यक्ष कॉ.काशीराम सिरसाट,कॉ. दत्ता डाके,कॉ.गंगाधर पोटभरे,कॉ.जगदीश फरताडे,कॉ.विष्णू देशमुख,कॉ.दादासाहेब सिरसाट,कॉ.रुस्तम माने,कॉ.बळीराम देशमुख,रामनाथ महाडिक,बाळासाहेब कडभाने आदी होते.जिल्हाधिकारी यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असे शिस्टमंडळाने सांगितले.या निदर्शने मोर्च्यात शेकडो शेतकरी सहभागी होते.
#कृषिवाणी