देश विदेशमहाराष्ट्र

शिक्षण क्षेत्रातील “आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्व” पुरस्काराने विश्वविक्रमवीर प्रशिक्षक सर नागेश जोंधळे सन्मानित

वैभवशाली महाराष्ट्र न्युज
================
अंबाजोगाई (वार्ताहर)
शिक्षण क्षेत्रातील “आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्व” या पुरस्काराने विश्वविक्रमवीर प्रशिक्षक सर नागेश जोंधळे यांना पुणे येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष समारंभात मान्यवरांकडून सन्मानित करण्यात आले.निर्वाण फाउंडेशन, नाशिक यांच्या तर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्वास त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरित करून त्यांच्या कार्यास बळ देण्याच्या विधायक उद्देशाने कर्तृत्ववान व्यक्तींना दरवर्षीच हा मानाचा पुरस्कार देण्यात येतो. यावेळी शिक्षण क्षेत्रात आपल्या कार्यशैलीचा आगळा-वेगळा ठसा उमटविणाऱ्या, इंग्रजी भाषेची चळवळ ही ग्रामीण भागातील खेड्यापाड्यांतील वस्तीमधून, शहर, महानगर, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरांवर पोहोचवून अत्यंत कमी कालावधीत संधीचे दरवाजे उघडून हजारो तरूणांच्या करिअरला नवी दिशा देणारे आंतरराष्ट्रीय आयएसओ मानांकन प्राप्त ‘आई सेंटर’चे प्रमुख तथा डायनॅमिक कमुनिकेटर अशी ख्याती असलेले विश्वविक्रमवीर प्रशिक्षक सर नागेश जोंधळे यांना ‘ शिक्षण क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्व पुरस्कार – २०२१ ‘ (इंटरनॅशनल आयडॉल अवॉर्ड – २०२१ इन द कॅटेगरी एज्युकेशन) ने निर्वाण फाउंडेशनचे अध्यक्ष तथा प्रयोगशील फिल्म डायरेक्टर निलेश यशवंतराव आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वविक्रमवीर तथा प्रेरणादायी वक्ते राहुल बनसोडे यांच्या हस्ते व आई सेंटरचे फ्रॅंचायजी डायरेक्टर संदीप अंबेसंगे व तरूण प्रशिक्षक प्रतीक गौतम यांच्या उपस्थितीत पुणे येथील एका पंचतारांकित हॉटेल मध्ये हा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. सत्काराबाबत आपले मनोगत व्यक्त करताना विश्वविक्रमवीर प्रशिक्षक सर नागेश जोंधळे यांनी आई सेंटरच्या माध्यमातून ” सशक्त राष्ट्र निर्मितीसाठी तरूणांना सक्षम बनविणे ” या उद्देशाने सुरू केलेले कार्य हे देश पातळीवरच नव्हे तर आता थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील घेऊन जात असताना विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन व वेळोवेळी त्यांना दिलेल्या हाकेला त्यांची मिळालेली बहुमोल साथ यामुळे हा प्रवास कितीही खडतर असला तरीही आलेल्या प्रत्येक प्रसंगाला धैर्याने सामोरे जाऊन अविरतपणे कार्य करण्याची मिळत असलेली प्रेरणा यामुळे सर जोंधळे यांचे कार्य मोठ्या उत्साहात सुरू आहे. अशावेळी ज्यांचे स्वतः अवॉर्ड विनिंग डायरेक्टर म्हणून ओळख आहे असे निर्वाण फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निलेश यशवंतराव आंबेडकर यांनी दिलेली कौतुकाची थाप ही नक्कीच ऊर्जा देणारी व प्रेरणादायक आहे. आपले हे आई सेंटरच्या माध्यमातून होत असलेले कार्य मोठ्या प्रमाणात करण्यासाठी आगामी काळात महत्त्वकांक्षी तरूण व तरूणी, त्यांच्या मधील असलेले नेतृत्व कौशल्य विकसित करून ज्यांना शिक्षण क्षेत्रात झोकून देऊन नवीन सकारात्मक बदल घडविण्यासाठी कार्य करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती आहे अशा ऊर्जावान व्यक्तींसाठी आई सेंटरचे ‘फ्रॅंचाईजी मॉडेल’ तयार करण्यात आले असून आपले मिशन गाव, तालुका, जिल्हा, प्रदेश, राज्य, देश तसेच आंतरराष्ट्रीय स्तरांवर अधिक गतिमान करण्याचा मानस सर नागेश जोंधळे यांनी व्यक्त केला. आपणांस मिळालेल्या ‘आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्व पुरस्कार – २०२१’ हा सर नागेश जोंधळे यांनी सर्व प्रेरणादायी महामानव, त्यांचे आई – वडील शांताबाई व भुजंगराव जोंधळे, आदर्श व्यक्तिमत्व पोलीस खात्यातील आयकॉनिक आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील, मोठे बंधू-बहिणी, पत्नी स्वाती नागेश जोंधळे, आई सेंटरचे ऑनलाईन व ऑफलाईन प्रशिक्षण घेतलेले सर्व फॅमिली मेंबर्स, मेंटाॅर्स तथा मार्गदर्शक, मित्र परिवार व शुभचिंतक यांना अर्पित केला. सर नागेश जोंधळे यांना मिळालेल्या आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्व पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वस्तरांतून कौतुक व अभिनंदन होत आहे.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.