राजकीय
केज विधानसभा मतदारसंघात होणार चुरशीची लढत ?
मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने जाणार यावर ठरणार उमेदवारांचे भविष्य

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
केज प्रतिनिधी
केज विधानसभा विशेष
बीड जिल्ह्यातील केज विधानसभा मतदारसंघातील निवडणूक यावेळी अतिशय निर्णायक ठरणार असुन यावेळी विकासाच्या मुद्यावर व सर्वसामान्यांचे प्रश्न यादृष्टीने हि निवडणूक विशेष समजली जात असुन यावेळी आजपर्यंतच्या निवडणूकीच्या दृष्टीने यावर्षी अनेकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल करुन यावेळचा आमदार मीच होणार हि गर्जना केली असुन यात राजकीय पक्षसह अनेक अपक्षांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे केज विधानसभा मतदारसंघात चुरस पाहायला मिळणार आहे उमेदवारांची डझनभर संख्या पाहता हि निवडणूक चुरशीची होणार आसल्याचे राजकीय वर्तुळात व मतदारांमध्ये बोलले जात असल्याची चर्चा होताना दिसत आहे.