डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकॅडमीचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रा.गौतम गायकवाड यांना मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष
=========
लातुर (प्रतिनिधी)
येथील प्रवर्तनवादी चळवळीतील आघाडीचे लेखक प्रा.गौतम गायकवाड यांच्या ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि आंबेडकरी साहित्य (आकलन आणि अवलोकन)’ या ग्रंथास सन 2022 साठी दिला जाणारा राज्यस्तरीय “डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकॅडमी” द्वितीय पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थित प्रदान करण्यात आला .
यापूर्वी याच संस्थेचा ‘व्हि.जे.आरक’ या ग्रंथास राज्यस्तरीय तृतीय, तर गतवर्षी “प्रज्ञासुर्याचे सुर्यपुत्र” या ग्रंथास राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. या उपरोक्त संस्थेचा सलग तिसरा पुरस्कार हा प्रा.गौतम गायकवाड यांना मिळाला आहे. ही विशेष बाब आहे. पुरस्काराचे वितरण रविवार, दि. 6 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 12.30 वाजता डॉ.भालचंद्र ब्लड बँक, बसस्टँड शेजारी, लातूर येथे आयोजित एका विशेष समारंभात
पुरस्कार सुप्रसिध्द कादंबरीकार, कथाकार आणि अंमळनेर येथे होणाऱ्या नियोजित 97 व्या आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.रविंद्र शोभणे, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवशटवार (लातूर) तसेच महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.राजकुमार मस्के (उदगीर) या मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. प्रा.गायकवाड यांचे 16 हून अधिक पुस्तके, विविध वृत्तपत्र, नियतकालिकांतून लेखन, दहा पेक्षा अधिक ग्रंथांचे संपादन, त्यांनी केले आहे. या सोबतच सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि धार्मिक कार्यात त्यांचा सक्रीय सहभाग राहिला आहे. अनेक चर्चासत्रात सहभाग घेत विविध नियतकालिकांतून त्यांचे अडीचशेहून अधिक लेख प्रकाशित झाले आहेत. नवोदित लेखक, साहित्यिक, कवी यांना प्रोत्साहन देण्याचे तसेच त्यांच्या ग्रंथ प्रकाशनासाठी सर्वोतोपरी भरीव मदत व सहकार्य करण्याचे कार्य देखिल प्रा.गायकवाड यांनी वेळोवेळी केले आहे. व्ही.जे.आरक सेवाभावी संस्था आणि परिवर्तन साहित्य मंडळाचे ते अध्यक्ष ही आहेत. तसेच ‘परिवर्तन संशोधन’ मासिकाचे कार्यकारी संपादक आहेत. परिवर्तन साहित्य संमेलनाच्या आयोजनात त्यांचा पुढाकार आहे. आगामी काळात 11 विविध विषयांशी संबंधीत ग्रंथ, काव्य संग्रह, प्रवर्तनवादी चळवळीला बळ देणाऱ्या ग्रंथाचे लेखक म्हणून ही ते ओळखले जातात. या सर्व ग्रंथसंपदा प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. प्रा.गौतम केरबा गायकवाड हे सध्या अंबाजोगाईतील खोलेश्वर महाविद्यालयात मराठी भाषा विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. मागील 32 वर्षांपासून अविरतपणे ते अध्यापनाचे कार्य करीत आहेत. प्रा.गौतम गायकवाड यांचे सामाजाच्या सर्वस्तरांतून अभिनंदन होत आहे.