सेंद्रिय व नैसर्गिक शेतीसाठी जयप्रभा ग्रामीण विकास मंडळाचा पुढाकार
शेतकऱ्यांना बैठकीतून मार्गदर्शन

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
डॉ.पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती व नैसर्गिक शेती मिशनच्या वतीने वरपगाव (ता.केज, जि.बीड) येथील डॉ.पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती गटातील सभासदांसाठी कृषी विभाग यांच्या वतीने सेंद्रिय शेती करण्यासाठी मिळणाऱ्या अनुदानातून बॅलर खरेदी करण्यासाठी बैठक आयोजीत करण्यात आली होती.
या बैठकीस प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ.आबासाहेब देशमुख हे तर यावेळी डॉ.पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती गटाचे अध्यक्ष डॉ.टि.एल.देशमुख, जयप्रभा ग्रामीण विकास मंडळाचे सचिव शिवाजीराव खोगरे, तालुका कृषी कार्यालय केज येथील आत्मा गटाचे प्रमुख पाटील साहेब, कृषी सहाय्यक सौ.लेमकर मॅडम, पोखरा विभागाचे प्रमुख राऊत साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तालुका कृषी कार्यालय, आत्मा विभागाच्या वतीने वरपगाव (ता.केज, जि.बीड) येथील डॉ.पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती व नैसर्गिक शेती मिशनच्या सेंद्रिय शेती गटातील शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानातून सप्त धान्यची स्लरी, दशपर्णी अर्क, डिकंपोजर, जिवाणू किटकनाशक, जिवाणू बुरशीनाशक, जिवाणू आदी सेंद्रिय घटक शेतकऱ्यांनी स्वतः तयार करून शेतात वापरण्यासाठी मिळणाऱ्या अनुदानातून बॅलर खरेदी करायचे ठरले. या प्रसंगी वरपगाव येथील डॉ.पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती गटाचे सचिव शिवाजीराव खोगरे यांनी सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी विविध प्रकारच्या खतांबद्दल माहिती दिली. त्याच बरोबर १० ड्रम सेंद्रिय थिअरी शेती, नैसर्गिक शेती, गांडुळ खत, शेतकऱ्यांच्या बांधावरची प्रयोगशाळा यामधील आलगी शेवाळ, सिलीकॉन, निमकरंज ऑईल व ट्रायकोडर्मा यांच्या वापराबद्दल व सुक्ष्म घटकांबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. त्याचबरोबर शेतीतील माती परिक्षण करणे का आवश्यक आहे. या बद्दल ही माहिती सांगीतली. या प्रसंगी पोखराचे प्रमुख श्री.राऊत यांनी कृषी विभागाच्या विविध योजना सांगितल्या, तर कृषी साहय्यक सौ.लेमकर मॅडम यांनी बियांची उगवण शक्ती कशी तपासावयाची याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. तर आत्मा विभागाचे पाटील यांनी डॉ.पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती व नैसर्गिक शेती मिशन गटाबद्दल महिती दिली. तसेच यावेळी प्राचार्य डॉ.आबासाहेब देशमुख यांनी विविध विषयांना अनुषंगून शेतीतील त्यांचे अनुभव सांगितले. आणि डॉ.पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती मिशन गट वरपगावचे अध्यक्ष डॉ.टि.एल.देशमुख यांनी सेंद्रिय शेती बद्दल व शेतातील उत्पादन वाढीबद्दल मार्गदर्शन करून अध्यक्षीय समारोप केला. शेवटी सर्व शेतकऱ्यांनी अनुदानातून सेंद्रिय शेती करण्यासाठी बॅलर खरेदी करण्याचे ठरवले. शेवटी शिवाजीराव खोगरे यांनी बैठक संपल्याचे जाहीर करून उपस्थित सर्व शेतकरी बांधव आणि प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले.